पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन, काय सुरु काय बंद?

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पनवेलसह संपूर्ण जिल्ह्यात दहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली (Ten days Lockdown Declared in Raigad District).

पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन, काय सुरु काय बंद?

रायगड :  रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पनवेलसह संपूर्ण जिल्ह्यात दहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे (Ten days Lockdown Declared in Raigad District). हा लॉकडाऊन 15 जुलै रोजी रात्री 12 वाजेपासून 24 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत राहील, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. रायगडमध्ये कोरोनाला रोखण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. विशेषतः पनवेल तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे (Ten days Lockdown Declared in Raigad District).

अलिबाग, पेण, रोहा, माणगाव, महाड या तालुक्यांमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत. या तालुक्यांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे या भागात पुण्यासारखा लॉकडाऊन घोषित करावा, अशी मागणी पुढे येत होती. अखेर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आज (13 जुलै) लॉकडाऊनची घोषणा केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत आज (13 जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हळदे, पोलीस अधीक्षक डॉ. अनिल पारसकर, सर्व आमदार यांची उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत आदिती तटकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. दरम्यान, शेतीच्या कामांना आणि केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या कंपन्यांना या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा : पुण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहीर, काय सुरु काय बंद?

“या लॉकडाऊन काळात कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, अनावश्यक घराबाहेर पडू नये. अचानक लॉकडाऊन नको म्हणून नागरिकांना दोन दिवस देण्यात आले आहेत. पहिल्या लॉकडाऊनसारखेच नियम 15 जुलैपासून लागू राहणार आहेत. याशिवाय 24 जुलैनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल”, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.

लॉकडाऊनच्या कालावधीत दारु विक्री बंद ठेवण्यात येणार आहे. चिकन, मटण, मासे विक्रीही बंद राहणार आहे. मेडिकल आणि दूध या सुविधा सुरुच राहतील. लॉकडाऊनदरम्यान होम डिलीव्हरीची सुविधा देण्याचा प्रयत्न राहील. ज्या नगरपालिकांनी बंद पाळले आहेत, त्यांनीही लॉकडाऊनमध्ये सहभागी व्हायचे आहे. कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा दहा दिवसांचा लॉकडाऊन घेत असल्याचे पालकमंत्री तटकरे यांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *