पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! भुयारी मेट्रोची ट्रायल रन यशस्वी, कशी पार पडली चाचणी? VIDEO
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम 85 टक्के पूर्ण झाल्याची माहिती देत मेट्रो प्रशासनाने एक महत्वाचा टप्पा पार केल्याचे सांगितले आहे.

अभिजीत पोते, पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या भुयारी मेट्रोचे काम जवळपास पूर्ण होत आहे. 85 टक्के काम पूर्ण झाले असून नुकतीच भुयारी मेट्रोची ट्रायल रन देखील यशस्वी झाली आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा ही चाचणी करण्यात आली आहे. पुणेकरांसाठी ही आनंदाची बातमी असून शिवाजीनगर टगे सिव्हिल कोर्ट असा तीन किलोमीटरचा प्रवास भुयारी मार्गाने मेट्रोने केला आहे. याबाबतची माहिती पुणे मेट्रोच्या प्रशासनाने दिली आहे. पुणे मेट्रोच्या वतिने एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असा एकूण 17.4 किलोमीटरचा मेट्रो मार्ग असणार आहे. त्यापैकी स्वारगेट ते शिवाजीनगर असा भुयारी मार्ग आहे. त्यापैकी आता 85 टक्के भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये जमिनीपासून 28 ते 30 मीटर खोलीवर भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहेत. लवकरच उर्वरित काम पूर्ण केले जाणार असून मेट्रोचे काम लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे याठिकाणी मेट्रो धावायला सुरुवात झाली आहे.
मंगळवारी सायंकाळी उशिरा मेट्रो प्रशासनाने एक आनंदाची बातमी दिली आहे. त्याचा खास एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम 85 टक्के पूर्ण झाल्याची माहिती देत मेट्रो प्रशासनाने एक महत्वाचा टप्पा पार केल्याचे सांगितले आहे.
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! भुयारी मेट्रोची ट्रायल रन यशस्वी… #PUNE #Metro #news pic.twitter.com/dWtMuKlfjw
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) December 7, 2022
इतकंच काय तर शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट अशा भुयारी मार्गावर मेट्रो धावली सुद्धा. एकूणच काय तर ट्रायल रन ची चाचणी सुद्धा यशस्वी झाली आहे.
पुणे शहरात पिंपरी चिंचवड ते स्वारगेट अशी मेट्रो धावणार आहे. त्यामद्धये शिवाजीनगर ते स्वारगेट असा भुयारी मार्ग असणार आहे.
भुयारी मार्गाचे एकूण आंतर 17.4 किलोमीटर आहे. त्यापैकी शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्टचे तीन किलोमीटरवर ट्रायल रनची चाचणी करण्यात आली आहे.
भुयारी मार्गाचे जवळपास 85 टक्के काम पूर्ण झाल्याचेही सांगण्यात आल्याने लवकरच मेट्रोचा प्रवास पुणेकरांसाठी सुरू होणार आहे.
