TET पेपर फुटप्रकरणात सरकार अँक्शन मोडवर, एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
टीईटीचा पेपर उद्या रविवारी, २८ जून २०२६ रोजी होणार असतानाच आधल्या दिवशी फुटल्याने लाखो उमेदवारांच्या तयारीवर पाणी फेरले आहे. या प्रकरणात आता राज्य सरकारने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

Breaking News
राज्यातील भावी शिक्षकांसाठीची टीईटी परीक्षा अवघ्या २४ तासांवर असताना तिचा पेपर फुटल्याने उद्या रविवारी ( २८ जून २०२६ )होणारी ही परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर राज्यातील पाच लाखाहून अधिक उमेदवारांची मेहनतीवर पाणी फेरले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us
