AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे बंधुंच्या भाषणाचा पहिलाच दणका! डरकाळी फुटताच केडिया गुडघ्यावर, व्हिडीओ पोस्ट करत थेट…

विजयी मेळाव्यानंतर लगेच सुशील केडिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागत शेअर केलेला व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

ठाकरे बंधुंच्या भाषणाचा पहिलाच दणका! डरकाळी फुटताच केडिया गुडघ्यावर, व्हिडीओ पोस्ट करत थेट...
Sunil KediaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 05, 2025 | 2:31 PM
Share

शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि ‘केडियोनॉमिक्स’ (Kedianomics) या ट्रेडिंग फर्मचा संस्थापक सुशील केडिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठीच्या मुद्द्यावरून चॅलेंज केले होते. त्यानंतर मनसे सैनिकांनी वरळीच्या विजयी मेळाव्याआधीच केडियांचे ऑफिस फाडले. त्यांच्या ऑफिसवर नारळ फेकले. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर केडिया गुडघ्यावर आले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राज ठाकरे यांची माफी मागितली आहे.

आज, 5 जुलै रोजी वरळी डोम येथे विजयी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जवळपास 18 वर्षांनी एकत्र आले आहेत. अनेकांची कित्येक वर्षांपासून त्यांना एकत्र पाहण्याची इच्छा या विजयी मेळाव्याच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. हा मेळावा संपताच सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांची माफी मागितली आहे.

Video: …तर मराठी लोकांचे चांगलेच हाल होतील; व्यापाऱ्यांच्या सभेत अमराठी महिलेची खुलेआम धमकी

‘मागितली माफी’

सुशील केडिया यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला ते, ‘नमस्कार, माझा ट्वीटचा वेगळा अर्थ काढण्यात आला’ असे बोलताना दिसत आहेत. पुढे व्हिडीओमध्ये त्यांनी राज ठाकरेंची माफी मागितली आहे. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मी माझे वक्तव्य मागे घेतो असे ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ:

काय होते वादग्रस्त वक्तव्य?

‘नोंद घ्या राज ठाकरे मी तीस वर्षांपासून मुंबईत राहतो तरी मला मराठी येत नाही. आता तुमचं याबाबत बेफाम गैरवर्तन पाहता मी पण प्रतिज्ञा करतो जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी भाषेचे कैवारी म्हणून वावरत आहेत. तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करायचे बोला…’, असे सुशील केडियाने म्हटले होते.

सुशील केडिया कोण आहे?

सुशील केडिया केडियानॉमिक्स या नावाची रिसर्च फर्म चालवतात. केडियानॉमिक्स या रिसर्च फर्मचे सुशील केडिया संस्थापक आहेत. ही संस्था संपत्ती नियोजन, आर्थिक सल्ले, आर्थिक विश्लेषणाच्या सेवा पुरवते. शेअर बाजारातील गुंतवणूकदार तज्ञ अशी केडिया यांची ओळख आहे. भारतीय शेअर बाजाराचा 20 वर्षांचा अनुभव असल्याचाही त्यांचा दावा आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.