AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mhada House : मोठी खुशखबर धडकली! म्हाडाचे घर झाले आणखी स्वस्त, एकनाथ शिंदेंचा थेट निर्णय

एकाच इमारतीत सारख्याच क्षेत्रफळाच्या घरांच्या वेगवेगळ्या किमती आकारण्यापेक्षा सरसकट २०-२१ चा रेडी रेकनर दर ग्राह्य धरून किंमत करून आकारण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालकांना दिले. यासोबतच या गृह प्रकल्पातील सोडतीमध्ये ज्या ४३४ लाभार्थ्यांनी आपली स्वीकृती पत्रे म्हाडाकडे जमा केली आहेत त्यांना

Mhada House : मोठी खुशखबर धडकली! म्हाडाचे घर झाले आणखी स्वस्त, एकनाथ शिंदेंचा थेट निर्णय
eknath shinde and mhada houseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 10, 2026 | 8:32 PM
Share

Thane MHADA House : ठाण्यातील चितळसर मानपाडा येथील गृहप्रकल्पातील घरांच्या किमती २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याबाबत यापूर्वी काढलेल्या सोडतीतील ४३४ विजेत्या लाभार्थ्यांना कायम ठेवत उर्वरित घरासाठी नव्या दराने सोडत काढावी,असे निर्देश देण्यात आले.

चितळसर मानपाडा येथील म्हाडाने विकसित केलेल्या गृहप्रकल्पातील ११७३ प्राप्त घरांपैकी ९३८ घरांची सोडत १४ जुलै २०२५ रोजी काढली. या सोडतीमध्ये २०२५-२६ च्या रेडी रेक्नर दराने घरांच्या किंमती आकारण्याचा निर्णय घेतल्याने याबाबत म्हाडा कार्यालयाला प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने आज दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झाली. या बैठकीला म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल, कोकण म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड आणि म्हाडाचे इतर प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी तसेच याबाबत तक्रार दाखल करणाऱ्या नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यात प्रामुख्याने या घरांना २०२०-२१ साली अंशतः भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याने या घरांच्या किमती तेव्हा १० हजार रुपये प्रति चौरस फुटांच्या दराने म्हणजे ४४ लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र त्याला पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र २०२५-२६ साली मिळाल्याने उर्वरित घरांची किंमत ५१ आणि ५२ लाखापर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे एकाच इमारतीत राहणाऱ्या दोन सदनिकाधारकांकडून सारख्याच जागेच्या सदनिकेसाठी वेगवेगळे दर आकारले जात असल्याने या दरामध्ये सुसूत्रता आणण्याची मागणी सदनिकाधारकांनी केली.

त्यामुळे एकाच इमारतीत सारख्याच क्षेत्रफळाच्या घरांच्या वेगवेगळ्या किमती आकारण्यापेक्षा सरसकट २०-२१ चा रेडी रेकनर दर ग्राह्य धरून किंमत करून आकारण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालकांना दिले. यासोबतच या गृह प्रकल्पातील सोडतीमध्ये ज्या ४३४ लाभार्थ्यांनी आपली स्वीकृती पत्रे म्हाडाकडे जमा केली आहेत त्यांना दिलासा द्यावा, तर उर्वरित घरांसाठी नवीन दरानुसार नव्याने लॉटरी काढण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले. त्यामुळे आता या गृहप्रकल्पातील घरांची नव्याने सोडत होणार असून २०२०-२१ च्या रेडी रेकनर दराप्रमाणे म्हणजे ४४ ते ४६ लाखात ती नागरिकांना उपलब्ध होतील.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत