Kalyan Murder : आधी महिलेची हत्या केली, मग थेट आधारवाडी जेलमध्ये पोहचला; पोलिसही चक्रावले !

रंजना जैस्वार असे मयत महिलेचे नाव असून ती कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात आपल्या कुटुंबासह राहते. रंजना हिचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय होता. तिची याच परिसरात राहणाऱ्या अजय राजभर सोबत मैत्री होती. रंजनाने अजयला काही पैसे उसनवार दिले होते. पैसे घेऊन बराच कालावधी झाला मात्र अजय पैसे देण्यास टाळाटाळ करत होता.

Kalyan Murder : आधी महिलेची हत्या केली, मग थेट आधारवाडी जेलमध्ये पोहचला; पोलिसही चक्रावले !
आधी महिलेची हत्या केली, मग थेट आधारवाडी जेलमध्ये पोहचला
Image Credit source: TV9
अमजद खान

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Apr 10, 2022 | 4:27 PM

कल्याण : वारंवार उसणे पैसे (Money) परत करण्यासाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा कर्जदाराच्या भाऊ आणि आईने काटा काढल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे महिलेची हत्या (Murder) केल्यानंतर आरोपीने थेट आधारवाडी जेल गाठले. एकाची हत्या करुन आलो आहे, मला पकडा असे त्याने पोलिसांना सांगितले. जेलमधील पोलिसांनी आरोपीला कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. विजय राजभर असे आरोपीचे नाव आहे. विजयच्या मोठ्या भावाने त्याच्या मैत्रिणीकडून एक लाख रुपये उसणे घेतले होते. ते पैसे परत करण्यासाठी सदर महिलेने वारंवार तगादा लावला होता. या तगाद्याला वैतागून विजय आणि त्याच्या आईने मिळून तिची हत्या केली. (A mother and son killed a woman over a money dispute in kalyan)

काय आहे नेमके प्रकरण ?

रंजना जैस्वार असे मयत महिलेचे नाव असून ती कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात आपल्या कुटुंबासह राहते. रंजना हिचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय होता. तिची याच परिसरात राहणाऱ्या अजय राजभर सोबत मैत्री होती. रंजनाने अजयला काही पैसे उसनवार दिले होते. पैसे घेऊन बराच कालावधी झाला मात्र अजय पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे मयत रंजना ही अजयच्या घरी जाऊन पैसे मागत होती. त्यामुळे अजयच्या कुटुंबीयांसोबतही तिचे वाद होत होते. काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास रंजना ही अजयच्या घरी गेली. मात्र अजय घरी नव्हता. तिने विजय आणि अजयची आई लालसा देवी यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला. यातून या तिघांमध्ये वाद झाला. याच वादातून संतापलेल्या विजय आणि त्याच्या आईने रंजनावर चाकूने वार करत तिची हत्या केली.

महिलेची हत्या करुन घराला कुलूप लावून आरोपी गायब झाले

महिलेची हत्या केल्यानंतर विजय आणि त्याची आई घराला बाहेरून कुलूप लावून तिथून निघून गेले होते. विजय सकाळी आधारवाडी जेल पोहोचला. त्याठिकाणी त्याने आपण हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला सर्व प्रक्रिया सांगितली नंतर तो कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आला. त्याने घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती देत हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. विजय आणि त्याची आई लालसा देवी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. (A mother and son killed a woman over a money dispute in kalyan)

इतर बातम्या

Badlapur Murder CCTV : टेबलाला धक्का लागला म्हणून तरुणाची हत्या! 8 ते 10 जणांकडून जाईपर्यंत मारहाण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें