AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, शरीरावर सिगारेटचे चटके, पीडिताच्या आईलाही मारहाण, आरोपीला बेड्या

डोंबिवलीत रामनगर पोलिसांनी एका चाळीस वर्षीय विकृताला अटक केली आहे (accused unnatural sexual assault on minor boy in Dombivali)

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, शरीरावर सिगारेटचे चटके, पीडिताच्या आईलाही मारहाण, आरोपीला बेड्या
आरोपी सूरज उर्फ सदाशीव शावरे
| Updated on: May 29, 2021 | 4:54 PM
Share

ठाणे : डोंबिवलीत रामनगर पोलिसांनी एका चाळीस वर्षीय विकृताला अटक केली आहे. हा आरोपी एका अल्पवयीन मुलावर गेल्या वर्षभरापासून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत होता. त्याने पीडित मुलाच्या शरीरावर सिगारेटचे चटकेही दिले. तसेच पीडित मुलाच्या आईला या घटनेची माहिती मिळाल्यावर त्याला जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर आरोपीने महिलेला मारहाण केली. अखेर आरोपीचा घडा भरला आणि रामनगर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या आरोपीचं नाव सूरज उर्फ सदाशीव शावरे असं आहे (accused unnatural sexual assault on minor boy in Dombivali).

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवलीत राहणारा एक पंधरा वर्षीय मुलगा गेले दोन दिवस घरी आला नाही. मुलाची आई आपल्या मुलाचा शोध घेत होती. दोन दिवसानंतर मुलगा घरी आल्यानंतर आईने विचारपूस केली. मुलाच्या बोलण्यावरुन आईला संशय आला. आईने मुलाला विश्वासात घेऊन त्याच्यासोबत घडलेला प्रकार विचारला. त्यानंतर या मुलाने जे सांगितलं ते ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली.

आरोपीने पीडित मुलाला दोन दिवस कोंडलं

या मुलासोबत डोंबिवली पूर्व परिसरात राहणारा एक व्यक्ती गेल्या वर्षभरापासून अनैसर्गिक अत्याचार करत होता. तो काही ना काही बहाण्याने मुलाला आपल्या घरी घेऊन जायचा. त्याच्यासोबत किळसवाणं आणि संतापजनक कृत्य करायचा. यावेळी तर त्याने मुलाला दोन दिवस कोंडून ठेवले होत. इतकेच नाही तर आरोपीने या दोन दिवसात या मुलाच्या अंगावर सिगारेटचे चटके सुद्धा ठेवले.

जाब विचारायला गेलेल्या आईलाही मारहाण

आईला ही बाब माहित पडताच मुलाला घेऊन आई आरोपी सदाशीव सावरे याच्या घरी गेली. तेव्हा या आरोपीने मुलासोबत आईला मारहाण करायला सुरुवात केली. घडलेली घटना आईने रामनगर पोलीस ठाण्यात सांगितली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई केली (accused unnatural sexual assault on minor boy in Dombivali).

पोलिसांची प्रतिक्रिया

या प्रकरणावर रामनगरचे गुन्हे शाखेचे पीआय समशेर तडवी यांनी प्रतिक्रिया दिली. “आई आणि मुलगा पोलीस स्टेशनला येताच आम्ही कारवाई सुरु केली. यासाठी पथक तयार करुन आरोपी सदाशीव शावरेला शोधून काढले. गेल्या एक वर्षांपासून तो फूस लावून मुलावर अत्याचार करत होता. या मुलाच्या व्यतिरिक्त दुसरे कोणी तक्रार देण्यासाठी अद्याप आलेले नाही. आमचा तपास सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा : मुंबईतील कुख्यात गुंडांच्या टोळीचा वंचित आघाडीशी संबंध? मुख्य गुंड जेरबंद, त्याच्या पत्नीचा पळून जाण्याचा प्रयत्न

19 वर्षीय तरुणाचा राग, सोसायटीच्या दोन सुरक्षा रक्षकांनी पोटात चाकू खुपसला, मीरा भाईंदर हादरलं !

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.