AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambernath : अंबरनाथच्या छाया हॉस्पिटलमध्ये तब्बल 16 वर्षांनी प्रसुती शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर नसल्यानं रुग्णांची होत होती परवड

अंबरनाथच्या डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून ऑपरेशन थिएटर बंद होतं. त्यामुळं मोठ्या शस्त्रक्रिया तर दूरच, पण साधी प्रसुतीची शस्त्रक्रिया करण्यासाठीही महिलांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात किंवा थेट ठाण्या-मुंबईला पाठवलं जात होतं. ज्यामुळं या गरोदर रुग्णांना त्रास तर होत होताच, पण काही वेळा उशीर झाल्यानं अडचणीही वाढत होत्या.

Ambernath : अंबरनाथच्या छाया हॉस्पिटलमध्ये तब्बल 16 वर्षांनी प्रसुती शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर नसल्यानं रुग्णांची होत होती परवड
अंबरनाथच्या छाया हॉस्पिटलमध्ये तब्बल 16 वर्षांनी प्रसुती शस्त्रक्रियाImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 19, 2022 | 1:25 AM
Share

अंबरनाथ : अंबरनाथच्या डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालयात तब्बल 16 वर्षांनी दोन प्रसुती शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात आल्या आहेत. नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन थिएटर (Operation Theatre) मध्ये या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात एकाच दिवशी 2 गोंडस बाळांनी जन्म घेतला. सोनू साळवे आणि तबस्सुम शेख या दोघींना प्रसुतीसाठी शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी त्यांची यशस्वी शस्त्रक्रिया करून प्रसुती करण्यात आली. यामध्ये सोनू साळवे यांना मुलगा तर तबस्सुम यांना मुलगी झाली. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरेश पाटोळे आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अरुणा बेलुरे, भूलतज्ज्ञ डॉ. तृप्ती चव्हाण, बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन देशमुख, मेट्रन उषा बनगर यांनी शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली. (After 16 years of obstetric surgery at the chhaya hospital in Ambernath)

गेल्या अनेक वर्षांपासून बंद होते ऑपरेशन थिएटर

अंबरनाथच्या डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून ऑपरेशन थिएटर बंद होतं. त्यामुळं मोठ्या शस्त्रक्रिया तर दूरच, पण साधी प्रसुतीची शस्त्रक्रिया करण्यासाठीही महिलांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात किंवा थेट ठाण्या-मुंबईला पाठवलं जात होतं. ज्यामुळं या गरोदर रुग्णांना त्रास तर होत होताच, पण काही वेळा उशीर झाल्यानं अडचणीही वाढत होत्या. हा त्रास थांबवण्यासाठी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पाठपुराव्यानं नुकतंच या हॉस्पिटलमध्ये नव्याने सुसज्ज ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात आलं आहे. या ऑपरेशन थिएटरमध्ये आता प्रसुतीच्या शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. तब्बल 16 वर्षांनी सोमवारी 18 एप्रिल रोजी एकाच दिवशी छाया हॉस्पिटलमध्ये प्रसुतीच्या दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

गरोदर महिलांची परवड थांबेल

छाया हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटर सुरू झाल्यानंतर गावातल्या गावातच बाळंतपण यशस्वी पार पडल्यामुळे दोन्ही मुलांच्या पालकांनी समाधान व्यक्त केलं. त्यामुळं भविष्यात अंबरनाथच्या गरोदर महिलांना प्रसुतीच्या शस्त्रक्रियेसाठी दुसऱ्या शहरात जाण्याची वेळ येणार नसून महिला आणि त्यांच्या नातेवाईकांची परवड थांबणार आहे. (After 16 years of obstetric surgery at the chhaya hospital in Ambernath)

इतर बातम्या

VIDEO : उल्हासनगरात गर्लफ्रेंडवरून दोन गटात तुंबळ हाणामारी, भररस्त्यात फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ

Smart City Award : राष्ट्रीय स्तरावरील इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड्स स्पर्धेत डिजीठाणे प्रकल्पाचा दुसरा क्रमांक

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.