आशा कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता, विमा रक्कम मिळणार, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन, आंदोलनाला यश

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीटू प्रणित आशा कर्मचारी युनियनच्या वतीने आज ठाणे जिल्ह्यातील सुमारे 100 आशा कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी निदर्शने केली.

आशा कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता, विमा रक्कम मिळणार, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन, आंदोलनाला यश
Asha worker protest in Thane

ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीटू प्रणित आशा कर्मचारी युनियनच्या वतीने आज ठाणे जिल्ह्यातील सुमारे 100 आशा कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी निदर्शने केली. राज्यभरात सुमारे 70,000 आशा कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत कायम करावे, किमान वेतन मिळावे, कोव्हिड काळात भत्ता, सुरक्षा साधने, विमा संरक्षण, मोफत आरोग्यसेवा मिळावी या मागण्यांसाठी आशा कर्मचारी 15 जून पासून राज्यात बेमुदत संपावर गेल्या आहेत. मात्र सरकारने अजूनही त्यांची योग्य दखल घेतलेली नाही. त्यामुळेच आज ठाणे जिल्ह्यातील 100 आशा कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. (Asha worker will get covid allowance, insurance amount, assurance of Thane District Collector, protest successful)

आजच्या ठाण्यातील निदर्शनांची जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्वरित दखल घेत शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले. कोव्हिड काळात मनपांनी कबूल केलेला भत्ता, मृत आशा कर्माचाऱ्यांना विमा रक्कम तसेच जिल्ह्यातील सर्व आशा कर्माचाऱ्यांना सुरक्षा उपकरणे पुरवण्याचे तसेच राज्यस्तरीय मागण्यांची शिफारस पुढे पाठवण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

शिष्टमंडळात सीटू आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने प्राची हातिवलेकर, सुनील चव्हाण, दत्तू खराड, संगीता प्रजापती, रुद्रा ठोंबरे, विद्या चव्हाण, सोनू खंदारे, अपेक्षा जाधव, गीता माने यांचा समावेश होता. किमान वेतन मिळेपर्यंत आपला संप सुरुच ठेवण्याचा निर्धार यावेळी जिल्ह्यातील सर्व आशा कर्माचाऱ्यांनी केला.

इतर बातम्या

कर्करुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता राज्य सरकारचा मोठा निर्णय, ठाण्यात मोठं हॉस्पिटल उभारणार

नाल्याचं पाणी घरात, पाण्यासह विंचू, सापांचंही आगमन, स्थानिक भडकले, थेट नाल्यात बसून आंदोलन

VIDEO | बंदी असतानाही डोंबिवलीत बैलांच्या झुंजीचे आयोजन, पोलिसांकडून तपास सुरु 

(Asha worker will get covid allowance, insurance amount, assurance of Thane District Collector, protest successful)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI