VIDEO | बंदी असतानाही डोंबिवलीत बैलांच्या झुंजीचे आयोजन, पोलिसांकडून तपास सुरु 

जुन्या डोंबिवलीतील क्रिकेट ग्राऊंडवर ही झुंज लावण्यात आले होते. जिंकणाऱ्या बैल मालकाला एक लाख रुपये मिळाल्याची माहिती समोर आली होती. (bullfight in Dombivli video get viral police investigation) 

VIDEO | बंदी असतानाही डोंबिवलीत बैलांच्या झुंजीचे आयोजन, पोलिसांकडून तपास सुरु 
dombivali bullfight
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Namrata Patil

Jun 21, 2021 | 3:25 PM

डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत बैलांच्या झुंजीचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मात्र बंदी असतानाही बैलांच्या झुंजीचे आयोजन केले जात आहे. नुकतंच डोंबिवली पश्चिमेकडील जुन्या डोंबिवली क्रिकेट ग्राऊंडवर आयोजन करण्यात आले होते. जवळपास 1 लाख रुपयांसाठी ही झुंज लावण्यात आली होती. याबाबतचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. (bullfight in Dombivli video get viral police investigation)

क्रिकेट ग्राऊंडवर बैलाची झुंज

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत बैलगाडीची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीत हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाली होते. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली होती. आता दोन बैलांची झुंज लावल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जुन्या डोंबिवलीतील क्रिकेट ग्राऊंडवर ही झुंज लावण्यात आले होते. जिंकणाऱ्या बैल मालकाला एक लाख रुपये मिळाल्याची माहिती समोर आली होती.

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर बैल गाडीच्या शर्यतीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या शर्यतीत हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले होते. या शर्यतीची माहिती पोलिसांना का मिळाली नाही? असा सवाल उपस्थित केला होता.  या प्रकरणाची गंभीर दखल पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी घेतली होती.

यावेळी शर्यत लावणाऱ्या आणि त्यात भाग घेणाऱ्या 70 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ताजे असताना आता दुसरा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यातही दोन बैलांची झुंज लावली होती. डोंबिवली पश्चिमेतील क्रीकेट ग्राऊंडवर एक लाखाच्या बक्षिसासाठी या दोन बैलांची झुंज लावण्यात आली.

पोलिसांकडून तपास सुरु 

बैलांची झुंज लावण्यावर बंदी असताना वारंवार या घटना घडत आहे. त्यामुळे ही एक चिंतेची बाब बनली आहे. हा व्हिडीओ तीन ते चार दिवसांपूर्वीचा असल्याचे बोलल जात आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

(bullfight in Dombivli video get viral police investigation)

संबंधित बातम्या : 

ठाण्यात कारमध्ये मृतदेह, मृतकाच्या गळ्यावर जखमा, पोलीस गूढ कसं उलगडणार?

पोहण्यासाठी पाण्यात उडी, एक जण चिखलात रुतला, दुसऱ्याला चक्कर, तिसराही बुडाला, तिघांचा मृत्यू

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें