CCTV Video | वडापाव घ्यायला निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील दागिने हिसकावले, बाईकस्वार सीसीटीव्हीत कैद

65 वर्षीय वयोवृद्ध महिला आपल्या पतीसाठी वडापाव आणायला रस्त्याने जात असताना दोन दुचाकीस्वार चोरांनी या महिलेचा गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला.

CCTV Video | वडापाव घ्यायला निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील दागिने हिसकावले, बाईकस्वार सीसीटीव्हीत कैद
सोनसाखळी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद


कल्याण : दोघा बाईकस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेचा गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. पतीसाठी वडापाव आणायला गेलेल्या 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेचे दागिने चोरण्यात आले. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. (Kalyan Crime Bike rider Chain Snatchers caught in action in CCTV Video)

महिलेचा गळ्यातील दागिने हिसकावले

राज्यात अनलॉक सुरु होत असताना गुन्हेगारीतही पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 65 वर्षीय वयोवृद्ध महिला आपल्या पतीसाठी वडापाव आणण्यासाठी जवळच्या दुकानात चालली होती. रस्त्याने जात असताना दोन दुचाकीस्वार चोरांनी या महिलेचा गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला.

सीसीटीव्हीच्या मदतीने चोरांचा शोध

कल्याणमधील वायलेनगर परिसरात मोहन प्राई़ड इमारतीसमोर घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मनिषा चाफेकर असे या महिलेचे नाव आहे. कल्याणचे खडकपाडा पोलिस सीसीटीव्हीच्या सहाय्याने दोन्ही सोनसाखळी चोरांचा शोध घेत आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

45 मिनिटात चोरट्यांनी घरात डल्ला मारला, पण नागपूर पोलिसांनी एकच धागा हेरला

दुकानदारावर गोळी झाडणार, तोच चिमुकलीची हाक, ‘बाबा’ ऐकून लुटारुंनी प्लॅन बदलला

(Kalyan Crime Bike rider Chain Snatchers caught in action in CCTV Video)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI