Kalyan Crime : टिटवाळ्यात जागेच्या वादातून प्राणघातक हल्ला, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

टिटवाळ्यातील मांडा परिसरात काही महिन्यांपासून जागेच्या मालकी हक्काचा वाद सुरु आहे. ज्या व्यक्तीच्या नावे ही जागा आहे, त्या व्यक्तीने आपल्या जागेवर बॉन्ड्री वॉल बांधण्याचे काम अन्वर शेख नावाच्या व्यक्तिला दिले होते. आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी अन्वर शेख पोहचले होते.

Kalyan Crime : टिटवाळ्यात जागेच्या वादातून प्राणघातक हल्ला, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
टिटवाळ्यात जागेच्या वादातून प्राणघातक हल्ला
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 9:10 PM

टिटवाळा : जागेच्या वादातून एका व्यक्तिला बेदम मारहाण (Beating) करुन जखमी केल्याची घटना टिटवाळामध्ये घडली आहे. अन्वर शेख असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. या मारहाणीची व्हिडिओ सोशल मीडिया (Social Media)वर चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. जखमी अन्वर शेख याच्यावर कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून मारहाण करणाऱ्या विरोधात ठोस कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. (Assault on a man in a land dispute in Titwala, Video goes viral on social media)

लोखंडी सळईने शेख यांना मारहाण

टिटवाळ्यातील मांडा परिसरात काही महिन्यांपासून जागेच्या मालकी हक्काचा वाद सुरु आहे. ज्या व्यक्तीच्या नावे ही जागा आहे, त्या व्यक्तीने आपल्या जागेवर बॉन्ड्री वॉल बांधण्याचे काम अन्वर शेख नावाच्या व्यक्तिला दिले होते. आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी अन्वर शेख पोहचले होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) गटाचे कल्याण जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते आणि समाजसेवक नरसिंग गायसमुद्रे हे उपस्थित होते. यावेळी काही लोकांनी अन्वर शेखसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांना तीन ते चार जणांनी लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. सळईने त्याच्या डोक्यावर हल्ला करण्यात आला. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अन्वर शेख यांना उपचारासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी दोषींच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांचे म्हणणो आहे.

कल्याणमध्ये तरुणाची हत्या

कल्याणच्या बंदरपाडा परिसरात शेतीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. धारदार शस्त्रने तरुणाच्या डोक्यावर हल्ला करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील, खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक पवार दाखल झाले. तरुण कोण आहे. त्याची हत्या कोणी व कशासाठी केली याचा तपास पोलिस करीत आहे. (Assault on a man in a land dispute in Titwala, Video goes viral on social media)

इतर बातम्या

खळबळजनक ! परळीत वृद्ध बहिण-भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, हत्येचे कारण अस्पष्ट

Nagpur Crime | आधी मुलावर अत्याचार आता दारूसाठी खंडणी, नागपूर पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.