AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपत गायकवाड प्रकरणावर भाजप पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक, हालचाली वाढल्या

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कल्याण ग्रामीणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणपत गायकवाड प्रकरणावर भाजप पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक, हालचाली वाढल्या
| Updated on: Feb 09, 2024 | 4:29 PM
Share

सुनील जाधव, Tv9 प्रतिनिधी, कल्याण | 9 फेब्रुवारी 2024 : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गेल्या आठवड्यात उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचा प्रकार घडला. गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. महेश गायकवाड यांच्यासह त्यांचे मित्र राहुल पाटील हे देखील या घटनेत जखमी झाले. या घटनेनंतर गणपत गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपला गुन्हा कबूल केला. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. गणपत गायकवाड हे सध्या अटकेत आहेत. त्यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण या घटनेमुळे कल्याण डोंबिवली शहरात भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भाजप कार्यकर्ते गणपत गायकवाड यांच्या बाजूने खमकेपणाने उभे असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराच्या घटनेनंतर भाजप शहराच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचील गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीत गणपत गायकवाड यांच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. तसेच सर्व कायकर्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कल्याणमधील सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत सविस्तर भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीत गणपत गायकवाड यांच्या बाजूने खमकेपणाने उभा राहण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा भाजप कार्यकर्त्यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.

बैठकीत नेमकं काय ठरलं?

कल्याण पाठोपाठ कल्याण ग्रामीण भागातही भाजप पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण ग्रामीणच्या मलंगगड परिसरातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत गणपत गायकवाड यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी लवकरच वरिष्ठांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिलीय. विशेष म्हणजे वरिष्ठांना भेटल्याशिवाय माध्यमांशी बोलायचं नाही अशा प्रकारच्या सूचना वरिष्ठांनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

गणपत गायकवाड यांच्याकडून अनेकवेळा माध्यमांसमोर नाराजी व्यक्त

कल्याण डोंबिवलीत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात शीतयुद्ध सुरु असल्याची माहिती सर्वश्रूत आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी डोंबिवलीत भाजपच्या झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा द्यायचा नाही, असाही ठराव झाला होता. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील मतभेद टोकाला गेल्यामुळे वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांना हस्तक्षेप करावा लागला होता. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून अनेकवेळा शिंदे गटाबाबतची नाराजी व्यक्त केली जात होती. आपल्याला न बोलावता, बॅनरबाजी करुन विकासकामांचं परस्पर उद्घाटन केलं जातं, अशी गणपत गायकवाड यांची तक्रार असायची.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.