Dombivali : स्मशानभूमीचे काम एक महिन्यात झाले नाही तर प्रशानाची अंत्ययात्रा काढू, भाजपकडून केडीएमसी प्रशासनाला इशारा

स्मशानभूमीच्या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. कंत्रटदाराकडून 60 टक्के काम केले आहे. त्याला केवळ 6 टक्केच बिल दिले गेले आहे. प्रशासन आणि सत्ताधारी यांच्या उदासीनतेमुळे हा प्रकार सुरु आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

Dombivali : स्मशानभूमीचे काम एक महिन्यात झाले नाही तर प्रशानाची अंत्ययात्रा काढू, भाजपकडून केडीएमसी प्रशासनाला इशारा
भाजपकडून केडीएमसी प्रशासनाला इशारा
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 9:42 PM

डोंबिवली : डोंबिवली स्मशानभूमी(Cemetery)च्या कामात दिरंगाई होत असल्याने त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा प्रकार होत आहे. कंत्राटदाराकडून 60 टक्के काम पूर्ण करुन देखील त्याला फक्त 6 टक्के बिल देण्यात आले आहे. एक महिन्यात स्मशानभूमीचे काम झाले नाही तर त्याच स्मशानभूमीत प्रशासनाची अंत्ययात्रा काढून असा इशारा डोंबिवली भाजप(BJP)कडून देण्यात आला आहे. डोंबिवली पूर्व भागात शिवमंदिर परिसरात स्मशानभूमीत काम सुरु आहे. या ठिकाणी लाकडाच्या रॅकेटचा काम आणि चिमणीचे काम काही महिन्यापासून सुरु आहे. रॅकेटच्या कामासाठी एक कोटी 31 लाखाचा निधी मंजूर आहे. चिमणीच्या कामासाठी एक कोटी पाच लाखाचा निधी मंजूर आहे. या स्मशानभूमीत कामासंदर्भात आज डोंबिवलीच्या शहर कार्यालयात भाजपकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. (BJP warns KDMC administration over cemetery issue in dombivali)

भाजपचे प्रशासनावर गंभीर आरोप

भाजपचे माजी नगरसेवक मंदार हळबे महिला जिल्हाध्यक्ष पूनम पाटील, अमृता जोशी, संजीव बिरवाडकर, संदीप पुराणिक, विशू पेडणेकर आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदे दरम्यान हळबे यांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले. स्मशानभूमीच्या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. कंत्रटदाराकडून 60 टक्के काम केले आहे. त्याला केवळ 6 टक्केच बिल दिले गेले आहे. प्रशासन आणि सत्ताधारी यांच्या उदासीनतेमुळे हा प्रकार सुरु आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. येत्या एक महिन्यात या स्मशानभूीचे काम झाले नाही तर याच स्मशानभूमीत प्रशासनाची अंत्ययात्र काढणार असल्याचा इशारा मंदार हळबे यांनी दिला आहे. याबाबत शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मोरे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता या मुद्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

महापालिकेकडून आरोपाचे खंडन

केडीएमसीच्या शहर अभियंत्या सपना कोळी सांगितले की, स्ट्रक्चरल रिपेरिंगचे काम सुरु आहे. कामात दिरंगाई नाही. लवकरच हे काम मार्गी लावले जाईल. मात्र कॅमेऱ्यावर प्रतिक्रिया मिळू शकली नाही. (BJP warns KDMC administration over cemetery issue in dombivali)

इतर बातम्या

Kalyan : कल्याण शहरातील आदिवासी पाडे असुविधाच्या गर्तेत, 75 वर्षानंतरही स्वच्छता गृहाची प्रतीक्षा

VIDEO : बदलापूरमध्ये ज्वेलर्स व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चोरी, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.