Pappu Kalani in Ulhasnagar : पप्पू कलानी आता 14 दिवस उल्हासनगरात, नाशिक जेलमधून बाहेर!

उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचं निधन झाल्यानंतर तुरुंगात असलेले त्यांचे पती पप्पू कलानी याला पेरोल मंजूर झालाय.

  • निनाद करमरकर, टीव्ही 9 मराठी, उल्हासनगर
  • Published On - 20:32 PM, 19 Apr 2021
Pappu Kalani in Ulhasnagar : पप्पू कलानी आता 14 दिवस उल्हासनगरात, नाशिक जेलमधून बाहेर!

उल्हासनगर : उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचं निधन झाल्यानंतर तुरुंगात असलेले त्यांचे पती पप्पू कलानी याला पेरोल मंजूर झालाय. पत्नीच्या अंत्यदर्शनासाठी पप्पू कलानीला पेरोल मंजूर झालाय. त्यामुळे पप्पू कलानी आता 14 दिवस तुरुंगाबाहेर असणार आहे. तो उल्हासनगरमध्ये पुन्हा आल्याने सध्या त्याच्याविषयी चर्चेला उधाण आलंय (Criminal politician Pappu Kalani on parole for funeral of wife Jyoti Kalani in Ulhasnagar).

पेरोल मिळाल्यानंतर पप्पू कलानी पत्नी ज्योती कलानी यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतः हजर राहिला. ज्योती कलानी यांचं रविवारी (18 एप्रिल) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आज (19 एप्रिल) उल्हासनगरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर सिंधी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ज्योती कलानी यांचा मुलगा, टीम ओमी कलानीचे प्रमुख ओमी कलानी यांच्यासह ज्योती कलानी यांचे पती सुरेश (पप्पू) कलानी देखील उपस्थित होते.

पप्पू कलानी तुरुंगात शिक्षा का भोगत आहे?

पप्पू कलानी 2013 पासून एका हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. सध्या तो नाशिक कारागृहात होता. मात्र, ज्योती कलानी यांचं निधन झाल्यानंतर त्याला 14 दिवसांची रजा मिळण्याची विनंती कलानी परिवाराने शासनाकडे केली. त्यांची ही मागणी मान्य होऊन आज पप्पू कलानी नाशिक कारागृहातून थेट स्मशानभूमीत दाखल झाला. आता पुढील 14 दिवस पप्पू कलानी याचा मुक्काम उल्हासनगरात असणार आहे.

कोण आहे पप्पू कलानी? (Who is Pappu Kalani?)

पप्पू कलानी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला उल्हासनगरमधील राजकारणी आहे. त्याच्याविरोधात एकूण 19 गुन्हे दाखल आहेत. यातील 8 गुन्हे खूनाचे आहेत. 1980 मध्ये गुन्हेगारी टोळीचा मोरक्या म्हणून उदयास आल्यानंतर तो उल्हासनगर महापालिकेचा महापौर झाला. 1990 मध्ये तो काँग्रेसच्या तिकिटावर उल्हासनगरमधून आमदार झाला. 1995 आणि 1999 मध्ये तो अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक जिंकला आणि विधानसभेत पोहचला. 1992 ते 2001 या काळात तो तुरुंगात असतानाही त्याने दोनदा निवडणूक जिंकली. 2004 मध्ये तो रिपब्लिक पक्षाच्या (आठवले गट) तिकिटावर निवडून आला.

हेही वाचा :

उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचं निधन, मोदी लाटेतही राष्ट्रवादीकडून विजय

ओमी कलानी गँगची दहशत, 50 लाखांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचं अपहरण

व्हिडीओ पाहा :

Criminal politician Pappu Kalani on parole for funeral of wife Jyoti Kalani in Ulhasnagar