Kalyan : कल्याण डोंबिवलीत देखील 500 चौरस फुटाच्या घरावर मालमत्ता कर माफ करण्याची मागणी

Kalyan : कल्याण डोंबिवलीत देखील 500 चौरस फुटाच्या घरावर मालमत्ता कर माफ करण्याची मागणी
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ज्या प्रकारे माफी दिली. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवलीत सुद्धा मालमत्ता कर माफ होईल अशी आशा विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली आहे. पालकमंत्र्यांच्या मागे लागून आपण या विषयाचा पाठपुरावा करु. पालकमंत्र्यांनी शब्द दिला होता. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे भोईर यांनी सांगितले.

अमजद खान

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 04, 2022 | 10:39 PM

कल्याण : मुंबई, ठाणे, नवी मुंबई नंतर आता कल्याण डोंबिवलीत 500 चैारस फुटाच्या घरावर मालमत्ता कर माफ केला जावा ही मागणी जोर धरु लागली आहे. पालकमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता. ते करणार आहेत त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले आहे. आज कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची शिवसेना आमदार भोईर यांनी भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी 500 चौरस फूट घरांवर सूट संदर्भात विधान केले.

मालमत्ता करबाबत पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – भोईर

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ज्या प्रकारे माफी दिली. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवलीत सुद्धा मालमत्ता कर माफ होईल अशी आशा विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली आहे. पालकमंत्र्यांच्या मागे लागून आपण या विषयाचा पाठपुरावा करु. पालकमंत्र्यांनी शब्द दिला होता. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे भोईर यांनी सांगितले. सकाळी शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी देखील हीच मागणी केली आहे.

दीपेश म्हात्रेंनीही केली मालमत्ता कर माफीची मागणी

मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिकेप्रमाणोच राज्य सरकारने कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 500 चौरस फूटाच्या घरांचाही मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यांच्याकडून ही मागणी मान्य केली जाईल अशी आपेक्षा म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. कोरोना काळात मुंबई, ठाणे नवी मुंबई प्रमाणे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांची अर्थिक परिस्थिती खराब आहे. सरकारने कर माफीची मागणी विचारात घेऊन कल्याण डोंबिवलीकरांनाही दिलासा द्यावा याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. (Demand for property tax waiver on 500 sq ft house in Kalyan Dombivali too)

इतर बातम्या

Thane Corona: तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज, रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्के

KDMC: कल्याण-डोंबिवलीत लसीकरणाच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेना आमने-सामने

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें