AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काम तर दूरच, निधीवरुन शिवसेना-भाजप-मनसेत जोरदार जुंपली !

एमएमआरडीएकडून केडीएमसीसाठी आलेल्या 360 कोटी निधीवरुन मनसेनंतर आता भाजपने हल्लाबोल केला आहे. माझ्या कामाला नवे नाव देऊन हा निधी मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सत्ताधारी शिवसेनेवर केला आहे.

काम तर दूरच, निधीवरुन शिवसेना-भाजप-मनसेत जोरदार जुंपली !
काम तर दूरच, निधीवरुन शिवसेना-भाजप-मनसेत जोरदार जुंपली
| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 8:22 PM
Share

ठाणे (कल्याण) : एमएमआरडीएकडून केडीएमसीसाठी आलेल्या 360 कोटी निधीवरुन मनसेनंतर आता भाजपने हल्लाबोल केला आहे. माझ्या कामाला नवे नाव देऊन हा निधी मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सत्ताधारी शिवसेनेवर केला आहे. तर खोटं बोला पण रेटून बोला ही भाजपची सवय आहे. निधी गणपत गायकवाड यांनी आणला होता तर 5 वर्ष त्यांचे हात कोणी धरले हेते, असा पलटवार शिवसेनेच्या कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण डोंबिवलीत सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएकडून केडीएमसीतील रस्त्यांसाठी 360 कोटी निधी मंजूर केल्याची घोषणा केली होती. खासदार शिंदे यांच्या घोषणेनंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेच्या खासदारावर आरोप केले होते. “डोंबिवली मानपाडा रस्त्यासाठी लागणारा निधी मी मंजूर करुन आणला होता. तो निधी आता 360 कोटीच्या निधीत दाखविला जात आहे”, असं राजू पाटील म्हणाले होते.

गणपत गायकवाड यांचा शिवेसेनेवर निशाणा

दुसरीकडे शिवसेनेने राजू पाटील यांनी मंजूर निधीच्या कागदपत्रात खाडाखोड केल्याचा आरोप केला होता. हे सुरु असतानाच आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देखील या मुद्यावरुन शिवसेनेवर तोफ डागली. “खासदारांनी मंजूर केलेला निधी हा माझ्या कामाला नवे नाव देऊन दाखविण्यात आला आहे. हा निधी कमी आहे. 123 कोटी रुपयांचा निधी मीच मंजूर करुन आणला होता”, असं गणपत गायकवाड म्हणाले.

शिवसेनेचं गणपत गायकवाड यांना प्रत्युत्तर

आमदार गणपत गायकवाड यांच्या या आरोपास शिवसेनेचे गोपाळ लांडगे यांनी उत्तर दिले आहे. “गायकवाड यांचे म्हणणे आहे, खोटे बोला पण रेटून बोला ही भाजपची सवयच आहे. त्यांनी जर निधी मंजूर केला होता. तर त्यांचे हात 5 वर्ष कोणी बांधून ठेवले होते. माजी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या असलेल्या आमदारांनी एकही विकास काम केलेले नाही. 360 कोटीच्या निधीसाठी केवळ खासदारांनी प्रयत्न केले होते. ते त्यांनी मंजूर केले आहेत”, अशी भूमिका गोपाळ लांडगे यांनी मांडली.

हेही वाचा : 

अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर श्रावणातही बंदच, भाविक यंदाही भोलेनाथाच्या दर्शनापासून वंचित

मुलाच्या लग्नाच्या पैशात 2 हजार नागरिकांना कोरोना लस; भाजपा आ. गणपत गायकवाड यांचा आदर्श उपक्रम

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.