Rajesh Narvekar : ठाणे जिल्ह्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण मोहिम राबविणार, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची माहिती

या नियमांमध्ये केलेल्या सुधारणेनंतर मतदार नोंदणी अधिकारी (ERO) हे मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरूपात आणि रीतीने आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आले आहेत.

Rajesh Narvekar : ठाणे जिल्ह्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण मोहिम राबविणार, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची माहिती
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
Image Credit source: Google
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Aug 08, 2022 | 11:33 PM

ठाणे : भारत निवडणूक आयोगाद्वारे मतदारांकडून आधार क्रमांक प्राप्त करून घेण्यासाठीचा कार्यक्रम 1 ऑगस्टपासून सुरु करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यांत मतदान केंद्रां (Polling Stations)चे सुसूत्रीकरण करण्याबाबतची मोहिम (Campaign) राबविण्यात येत असून नमुना अर्ज क्र. 6, 7, 8 मध्ये सुधारणा करण्यात आल्या असून मतदार नोंदणी नमुन्यांमधील बदल करता येणार आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार नोंदणीसाठी आता वर्षांतून चार अर्हता दिनांक घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय निवडणुक कायदा (सुधारणा) अधिनियम, 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा केल्या आहेत. यावेळी ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार लोखंडे, नायब तहसीलदार स्मितल यादव यावेळी उपस्थित होते.

या नियमांमध्ये केलेल्या सुधारणेनंतर मतदार नोंदणी अधिकारी (ERO) हे मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरूपात आणि रीतीने आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आले आहेत. तसेच अधिसूचना 17 जून 2022 मध्ये नमूद केल्यानुसार 1 एप्रिल 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत असलेली प्रत्येक व्यक्ती याचा आधार क्रमांक उपलब्ध करून देऊ शकतो. 1 ऑगस्टपासून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

वर्षांतून चार अर्हता दिनांक घोषित

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वर्षांतून चार अर्हता दिनांक घोषित करण्यात आलेल्या आहे. संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 1 जानेवारी, निरंतर पुनरिक्षण कार्यक्रम 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर (Continuous Updation Qualifying Dute ) 17 वर्ष पूर्ण झालेले युवक व युवती देखील मतदार नोंदणीसाठी नमुना क्रमांक 6 भरून देवू शकतात, ज्या तारखेला वयाची 18 वर्ष पूर्ण होतील, त्या दिवशी त्यांचा अर्ज मंजूर करण्यात येईल.

नवीन 5 मतदान केंद्र मंजूर करण्याबाबत प्रस्ताव

ठाणे जिल्ह्यातील सुमारे 8 लाख 18 हजार छायाचित्र नसलेले मतदार मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे काही मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या कमी झाली आहे. तसेच नवीन मतदार नोंदणीमुळे पलावा सारख्या गृहसंकुलामध्ये एका मतदान केंद्रावर 5000 पेक्षा जास्त मतदारांची नोंदणी झाली आहे. अशा ठिकाणी नवीन 5 मतदान केंद्र मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताव पाठवण्यात येत आहे. एका मतदान केंद्रावर 1500 मतदार इतकी मर्यादा आहे. पुढील दीड वर्षांत अजून मतदार वाढणार आहेत. या बाबी लक्षात घेऊन मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्याबाबतची मोहिम ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (District Collector Rajesh Narvekar will conduct a campaign to streamline polling stations in Thane district)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें