AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटाच्या नेत्यांनी बाह्या सरसावल्या, महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवण्यासाठी कामाला, नेमकं काय घडतंय?

शिंदे गटाने आगामी राजकीय घडामोडींच्या (Maharashtra Politics) पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील (Thane) 'नंदनवन' या निवासस्थानी अतिशय महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

शिंदे गटाच्या नेत्यांनी बाह्या सरसावल्या, महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवण्यासाठी कामाला, नेमकं काय घडतंय?
| Edited By: | Updated on: Feb 01, 2023 | 6:02 PM
Share

ठाणे : शिवसेना (Shiv Sena) नाव आणि पक्षाच्या चिन्हाबाबतची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) आता अंतिम टप्प्यावर आली आहे. सुप्रीम कोर्टातही (Supreme Court) याबाबत 14 फ्रेब्रुवारीला सुनावणी आहे. तर केंद्रीय निवडणूक आयोगात दोन्ही बाजूकडून लेखी म्हणणं मांडण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आता याबाबत कुठल्याही क्षणी निकाल जाहीर करु शकतं. असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता कामाला लागले आहेत. आगामी काळात महाराष्ट्रात अतिशय महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. मुंबईसह राज्यातील अनेक मोठ्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. त्यापाठोपाठ लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणार आहेत. या आगामी निवडणुका लक्षात घेता शिंदे गट कामाला लागला आहे. शिंदे गटाने आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील ‘नंदनवन’ या निवासस्थानी अतिशय महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर खलबतं होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाची उद्या महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. संबंधित बैठक ही उद्या सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील ‘नंदनवन’ निवासस्थानी होणार आहे.

या बैठकीला शिंदे गटातील वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. खासदार गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ या बैठकीला विशेष उपस्थित असणार आहेत. या बैठकीत आधी वरिष्ठ नेते मार्गदर्शन करतील. त्यानंतर विविध मुद्द्यांवर चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते या बैठकीत गावपातळीपासून विभाग पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यानंतर संबंधित समस्यांवर मार्ग काढण्यासाठी काम केलं जाणार आहे.

पक्ष वाढीसाठी महत्त्वाचे खलबतं होणार

सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्ष वाढीसाठी या बैठकीत खलबतं होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख यांचा विस्तार करण्यासाठी या बैठकीत विचार होणार आहे.

विशेष म्हणजे युवासेनेच्या कार्यकारणी संदर्भात देखील चर्चा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. या बैठकीला मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख, पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय घडणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक ट्विटस्ट बघायला मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे ठाकरे गट स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कामाला लागला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून सर्वाधिक पदाधिकारी, आमदार खेचण्याचं काम सुरु आहे.

भाजप आपला पक्ष मजबूत करण्यासाठी जोमाने काम करत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत धुसफुसीच्या बातम्या समोर येत आहेत. शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेत्यांमध्येच एकमत नसल्याचं बघायला मिळालं आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान आगामी काळात कोणत्या पक्षाची कुणासोबत युती होईल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.