पुरोगामी महाराष्ट्रात तृतीय पंथीयांसाठी पहिलं आश्रम सुरु, भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभाग आणि राष्ट्रीय समाजिक सुरक्षा संस्थान यांच्या वतीने हे आश्रम सुरु करण्यात आले आहे (First Shelter home open in Kalyan for transgender)

पुरोगामी महाराष्ट्रात तृतीय पंथीयांसाठी पहिलं आश्रम सुरु, भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन
पुरोगामी महाराष्ट्रात तृतीय पंथीयांसाठी पहिलं आश्रम सुरु, भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

कल्याण (ठाणे) :तृतीय पंथीयांसाठी सरकारी कामात लागणाऱ्या वस्तू तयार करण्याचा उद्योग सरकारने सुरु करुन दिला पाहिजे. ते सक्षम झाले तर देश सक्षम होईल”, असे विधान भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केले. कल्याण पूर्व भागात द्वारली परिसरात तृतीय पंथियांसाठी सुरु करण्यात आलेल्या आश्रमाचा शुभारंभ आमदार गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ‘किन्नर अस्मिता’च्या निता केणे, तमन्ना केणे, सचिन तांबे आणि माधूरी शर्मा आदी उपस्थित होते (First Shelter home open in Kalyan for transgender).

निराधारांसाठी आश्रय देणारं आश्रम

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभाग आणि राष्ट्रीय समाजिक सुरक्षा संस्थान यांच्या वतीने हे आश्रम सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी 25 ट्रान्सजेंडर यांच्या वास्तव्याची सुविधा आहे. 18 ते 60 वयोगटातील ट्रान्सजेंटर या ठिकाणी राहू शकतात. जे ट्रान्सजेंडर निराधार आहे. तसेच जे वय झाल्याने आत्ता काम करु शकत नाहीत, त्यांच्यासाठी हा आश्रम आधार ठरणार आहे (First Shelter home open in Kalyan for transgender).

महाराष्ट्रात पहिलं आश्रम

केंद्र सरकारने ट्रान्सजेंडरसाठी राजस्थान, बिहार राज्यात गरीमा गृह सुरु केले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात प्रथम अशा प्रकारचं आश्रम सुरु केलं जात आहे. राज्यात दोनच ठिकाणी अशा प्रकारच्या आश्रम सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यापैकी कल्याणमध्ये आश्रम आजपासून सुरु झालं आहे. त्याचबरोबर गोरेगाव येथेही अशा प्रकारचं आश्रम सुरु होणार आहे.

जेवणाची सोय, कुक ते सुरक्षा रक्षकाची सोय

कल्याणच्या आश्रमात वास्तव करणाऱ्या ट्रान्सजेंडरकरीता जेवणाची सोय आहे. त्याकरीता एक कुक असेल. त्याचबरोबर एक सुरक्षा रक्षकही नेमण्यात आला आहे. संस्था केवळ त्यांच्या वास्तव्याची सुविधा करीत नसून त्यांच्या विकासासाठीही काम करीत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : अंबानी VS अदानी : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तुलनेत 2 महिन्यांच्या कालावधीत अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स 6 पट वाढला, गुंतवणूकदार झाले श्रीमंत

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI