Kalyan Fraud : कल्याण पश्चिमेत स्टॅम्प वेंडरकडून बनावट कागदपत्रांद्वारे व्यापाऱ्याची फसवणूक

बैलबाजार परिसरात राहणारा फिरोज अब्दुल रहिम खान नावाच्या व्यापाऱ्याने आपला गाळा स्टॅम्प वेंडर शमिम बानो यांना पाच वर्षापूर्वी भाडे तत्वावर दिला होता. बाजार भावानुसार या गाळ्याची किंमत 18 लाख रूपये आहे. मात्र आरोपी शमिम यांनी व्यापारी फिरोज यांना अंधारात ठेऊन 20 रूपयांच्या मुद्रांक शुल्क पेपरवर सदर गाळा फिरोज यांच्या वडिलांनी आरोपीला विकला असल्याचे बनावट खरेदी खत तयार केले.

Kalyan Fraud : कल्याण पश्चिमेत स्टॅम्प वेंडरकडून बनावट कागदपत्रांद्वारे व्यापाऱ्याची फसवणूक
कल्याण पश्चिमेत स्टॅम्प वेंडरकडून बनावट कागदपत्रांद्वारे व्यापाऱ्याची फसवणूक Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 7:11 PM

कल्याण : स्टॅम्प वेंडर महिलेने बनावट कागदपत्रां (Fake Document)द्वारे व्यापाऱ्याची फसवणूक (Fraud) करत त्याचा गाळा नावावर करुन घेतल्याची घटना कल्याण पश्चिमेत घडली आहे. बैलबाजार भागातील एका महिला स्टॅम्प वेंडर (Stamp Vendor)ने एका व्यापाऱ्याचा 18 लाख रूपये किमतीचा व्यापारी गाळा बनावट कागदपत्र तयार करून स्वतःच्या नावे करून घेतला. ही कागदपत्रे महावितरण, कल्याण डोंबिवली पालिकेत दाखल करून या दोन्ही शासकीय संस्थांचीही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी व्यापाऱ्याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शमिम बानो शेख असे आरोपी महिलेचे नाव आहे.

भाड्याने घेतलेला गाळा बनावट कागदपत्रांद्वारे नावावर केला

बैलबाजार परिसरात राहणारा फिरोज अब्दुल रहिम खान नावाच्या व्यापाऱ्याने आपला गाळा स्टॅम्प वेंडर शमिम बानो यांना पाच वर्षापूर्वी भाडे तत्वावर दिला होता. बाजार भावानुसार या गाळ्याची किंमत 18 लाख रूपये आहे. मात्र आरोपी शमिम यांनी व्यापारी फिरोज यांना अंधारात ठेऊन 20 रूपयांच्या मुद्रांक शुल्क पेपरवर सदर गाळा फिरोज यांच्या वडिलांनी आरोपीला विकला असल्याचे बनावट खरेदी खत तयार केले. या कागदपत्रांवर पंच, साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ही कागदपत्र खरी आहेत असे चित्र निर्माण केले. ही कागदपत्र घेऊन त्या आधारे महावितरण, कल्याण डोंबिवली पालिकेत काही महत्वाची कामे करून घेतली. तक्रारदार फिरोज खान यांना ही माहिती मिळताच, त्यांनी शमिम यांना गाळा खरेदी करण्यास सांगितले. शमिम गाळा आपल्या मालकीचा असल्याचा दावा करत होती. शमिम बानो हिने आपली फसवणूक केल्याने फिरोज यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महिलेने बनावट कागदपत्र कशी, कोठून तयार केली याचा तपास सुरू केला आहे. (Fraud of a trader through forged documents from a stamp vendor in Kalyan)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.