गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी घराबाहेर पडू नका, यंदाही फिरती विसर्जन व्यवस्था करणार: डॉ. विपीन शर्मा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 27, 2021 | 7:06 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्यासंदर्भातच्या राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केला आहे. त्यामुळे यंदा ठाणेकरांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी घराबाहेर पडू नये. (Ganesh Utsav 2021: Now, book your immersion time online to avoid crowd in Thane)

गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी घराबाहेर पडू नका, यंदाही फिरती विसर्जन व्यवस्था करणार: डॉ. विपीन शर्मा
artificial ganesh immersion

ठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्यासंदर्भातच्या राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केला आहे. त्यामुळे यंदा ठाणेकरांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी घराबाहेर पडू नये. तसेच ठाणेकरांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाही शहरात प्रत्येक प्रभाग समितीमध्ये फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. (Ganesh Utsav 2021: Now, book your immersion time online to avoid crowd in Thane)

कोविड- 19 च्या अनुषंगाने यावर्षी ही सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. यावर्षीही ठाण्यात गणेश विसर्जनाच्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिका विविध उपाययोजना करत आहे. त्यासाठी कृत्रीम तलावासोबतच स्विकृती केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे डिजी ठाणे प्रणालीव्दारे देखील गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकींग योजनाही राबविण्यात येणार आहे.

स्वयंसेवक नेमणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाही फिरती विजर्सन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या व्यवस्थेच्या माध्यमातून ट्रॅक्टर अथवा जीपच्या मागे सिंटेक्स टाकीच्या माध्यमातून कृत्रिम विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या ठिकाणी विसर्जनासाठी महापालिकेतर्फे स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. तसेच निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे, असं पालिकेने स्पष्ट केलं.

आरतीही घरीच घ्या

भाविकांना विसर्जनासाठीची आरती घरीच करावी लागणार आहे. महापालिकेने तयार केलेल्या या फिरत्या विजर्सन व्यवस्थेतंर्गत श्री गणेशाचे कृत्रिम तलावामध्ये ज्याप्रमाणे विधीवत विसर्जन करण्यात येते त्याच पध्दतीने श्रींचे विसर्जन करण्यात येणार आहे. महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये वाहनांव्दारे ही फिरती विसर्जन व्यवस्था तयार करण्यात येणार असल्याची माहितीही शर्मा यांनी दिली. (Ganesh Utsav 2021: Now, book your immersion time online to avoid crowd in Thane)

संबंधित बातम्या:

गृहसंकुलातील 78 एसींवर डल्ला, फेरीवाला बनून विक्री; पण मोबाईल लोकेशनने घात; वाचा पुढे काय घडलं?

कोरोनाचं संकट, दहीहंडी उत्सव रद्द, यंदा आरोग्य उत्सव साजरा करणार, प्रताप सरनाईकांचं स्तुत्य पाऊल

राज्यातील शाळा सुरु होण्याची शक्यता, अंबरनाथमध्ये शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम

(Ganesh Utsav 2021: Now, book your immersion time online to avoid crowd in Thane)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI