कोरोनाचं संकट, दहीहंडी उत्सव रद्द, यंदा आरोग्य उत्सव साजरा करणार, प्रताप सरनाईकांचं स्तुत्य पाऊल

ठाण्याची दहीहंडी ही जगप्रसिद्ध आहे. पण गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचं मोठं सावट आहे. त्यामुळे ठाण्यात यावेळी संस्कृती प्रतिष्ठानचा दहीहंडी ऊत्सव रद्द करुन त्याऐवजी आरोग्य ऊत्सव साजरा करणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

कोरोनाचं संकट, दहीहंडी उत्सव रद्द, यंदा आरोग्य उत्सव साजरा करणार, प्रताप सरनाईकांचं स्तुत्य पाऊल
प्रताप सरनाईक, आमदार शिवसेना

ठाणे : ठाण्याची दहीहंडी ही जगप्रसिद्ध आहे. पण गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचं मोठं सावट आहे. त्यामुळे ठाण्यात यावेळी संस्कृती प्रतिष्ठानचा दहीहंडी ऊत्सव रद्द करुन त्याऐवजी आरोग्य ऊत्सव साजरा करणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

दहीहंडी उत्सव रद्द, यंदा आरोग्य उत्सव साजरा करणार

कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढतो आहे. गेल्या तीन दिवसांचा आलेख पाहिला तर कोरोनाचं सावट वाढतंय असं वाटू लागलंय. तशा केसेसही समोर येऊ लागल्या आहेत. एकाच सोसायटीत 17 जणांचा कोरोना झाला. ठाण्यातही अनेकांना कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे ठाण्यात यावेळी संस्कृती प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आलेला असून त्याऐवजी आरोग्य उत्सव साजरा करणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे.

कोरोनाचं संकट, गोविंदा पथकांनी भावना समजून घ्याव्यात

गोविंदांवर नियंत्रण ठेवणं तारेवरची कसरत आहे. सरकारने दहीहंडीवर निर्बंध लादल्याने गोविंदा पथकं आक्रमक आहेत. त्यांच्या भावना मी समजू शकतो. जय जवान पथक तसंच इतरही पथकांच्या भावना समजू शकतो. पण त्यांनीही समजून घ्यावं, असं सरनाईक म्हणाले.

मनसेला हात जोडून विनंती दहीहंडी उत्सवासाठी आग्रह करु नये

मनसे किंवा इतर पक्षांनाही हात जोडून विनंती की हे वर्ष दहीहंडी साजरी करु नये, असं सांगताना दहीहंडीत सोशल डिस्टन्स पाळू शकत नाही. मास्क घालू शकत नाही. त्यात भरीस भर म्हणजे शेवटचे तीन थर 14 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांचा असतो. आणि सध्या लहान मुलांना कोरोनाचा धोका सर्वाधिक प्रमाणात आहे, हे आपल्याला माहिती आहे, असंही सरनाईक म्हणाले.

(canceling Dahihandi festival This year orgnize health festival said pratap Sarnaik)

हे ही वाचा :

राज्यातील शाळा सुरु होण्याची शक्यता, अंबरनाथमध्ये शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI