1.25 लाख द्या, मगच मृतदेह घेऊन जा, खासगी रुग्णालयाची दादागिरी, शिवसेनेच्या माजी आमदाराचा दणका

कोव्हिड-19 मुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे 1 लाख 25 हजार रुपये इतके बिल द्या आणि मगच मृतदेह घेऊन जा, अशी भूमिका घेणाऱ्या शहापूर येथील खासगी रुग्णालयाने घेतली होती.

1.25 लाख द्या, मगच मृतदेह घेऊन जा, खासगी रुग्णालयाची दादागिरी, शिवसेनेच्या माजी आमदाराचा दणका
Pandurang Barora

सुनील घरत, टीव्ही 9 मराठी, ठाणे : कोव्हिड-19 मुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे 1 लाख 25 हजार रुपये इतके बिल द्या आणि मगच मृतदेह घेऊन जा, अशी भूमिका घेणाऱ्या शहापूर येथील खासगी रुग्णालयाला शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी दणका दिला आहे. बरोरा यांनी एकही रुपया न भरता सदर मृतदेह नातेवाईकांच्या हवाली केल्याने त्यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. (Give 1.25 lakh Rs then take away the body, Arbitrary of a private hospital Shahapur, ShivSena ex MLA Slams hospital)

शहापूर तालुक्यातील नेवरे येथील एका गरीब कुटुंबातील वासुदेव निपुर्ते हे चार दिवसांपासून शहापूर येथील प्रणव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोना या आजारावर उपचार घेत होते. दुर्दैवाने त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एक लाख 18 हजार रुपयांचे बिल भरण्यास सांगितले. घरची परिस्थिती हालाकिची असल्याने एवढी रक्कम भरण्यासाठी नातेवाईकांकडे पैसे नव्हते. मात्र पैसे भरा आणि मगच मृतदेह ताब्यात देऊ, असा इशारा डॉक्टरांनी दिला.

सदर बाब मृताच्या नातेवाईकांनी शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना सांगितली. त्यानंतर आमदार पांडुरंग बरोरा यांनी दूरध्वनीवरून डॉक्टरांशी संपर्क केला, परंतु डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. बिल भरावेच लागेल असेही म्हटले. त्यानंतर आमदार पांडुरंग बरोरा यांनी तात्काळ प्रणव हॉस्पिटलमध्ये जाऊन एकही रुपया न देता सदर मृतदेह नातेवाईकांच्या हाती सुपूर्द केला.

नागरिकांकडून कौतुक

हा सर्व प्रकार पाहून शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा याचे कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर NCP कार्यकर्त्यांच्या पेजवरदेखील पांडुरंग बरोरा यांचं कौतुक होत आहे.

इतर बातम्या

सीरम इन्स्टिट्यूट Sputnik V लसीचंही उत्पादन करणार, DGCI ची मान्यता

मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय, आता हॉटेल-रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांचंही प्राधान्यक्रमानं लसीकरण

(Give 1.25 lakh Rs then take away the body, Arbitrary of a private hospital Shahapur, ShivSena ex MLA Slams hospital)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI