अंबरनाथमध्ये पहिलाच पाऊस, शेकडो जखमा, कुठे भिंत कोसळली, तर कुठे नाल्याचं पाणी सोसायटीत शिरलं

पावसामुळे अंबरनाथमधील एका सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळी भींत कोसळली आहे. पण सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे (Heavy rain hits Ambernath city).

अंबरनाथमध्ये पहिलाच पाऊस, शेकडो जखमा, कुठे भिंत कोसळली, तर कुठे नाल्याचं पाणी सोसायटीत शिरलं
शेकडो जखमा, कुठे भिंत कोसळली, तर कुठे नाल्याचं पाणी सोसायटीत शिरलं
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 5:42 PM

अंबरनाथ (ठाणे) : मुंबईसह, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पहिल्याच पावसाने मुंबई आणि ठाणेकरांना झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झालीय. कोरोना संकट सुरु असतानाच आता अतिवृष्टीमुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातही सकाळपासून पाऊस सुरु आहे. याच पावसाचा फटका अनेक भागांमध्ये बघायला मिळतोय. पावसामुळे अंबरनाथमधील एका सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळी भिंत कोसळली आहे. पण सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे (Heavy rain hits Ambernath city).

अंबरनाथ शहरात पावसामुळे शिवालिक नफर सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळची भिंत शेजारी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात कोसळली. या सोसायटीच्या मेन गेट समोरच खड्डा खोदून इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आलीये. त्यामुळे या भिंतीला आधार राहिला नव्हता. त्यातच आजच्या पावसामुळे भिंतीखालची माती खचून संपूर्ण भिंतच खड्ड्यात पडली. या ठिकाणी अनेक लहान मुलांचा वावर असतो. त्यामुळे आता सोसायटीने आणि शेजारील बांधकाम करणाऱ्या बिल्डरने सुरक्षात्मक उपायोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे (Heavy rain hits Ambernath city).

अंबरनाथमध्ये पहिल्या पावसानंतरही नाले तुंबलेलेच

अंबरनाथ शहराला पावसाला सुरुवात झाली, तरी नाले मात्र तुंबलेलेच आहेत. शहरातील प्रमुख नाल्यांच्या सफाईला अजूनही सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे शहरात पावसाळ्यात पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे. अंबरनाथ शहरातील पूर्व भागात बहुतांशी भाग हा उंचावर असून तिथलं पाणी वाहत येऊन बी केबिन रोडच्या नाल्याला मिळतं. पुढे हाच नाला जाऊन वालधुनी नदीला मिळतो. त्यामुळे शहरातलं पावसाचं सगळं पाणी वाहून नेण्याचं काम हा बी केबिन रोडचा नाला करतो.

मात्र तरीदेखील या महत्त्वाच्या नाल्याच्या स्वच्छतेकडे अंबरनाथ नगरपालिका प्रशासनानं पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कारण आज पहिल्याच पावसात या नाल्याचं पाणी उलट जाऊन गोसावी सोसायटीमध्ये शिरलं. या नाल्याची सध्याची अवस्था पाहिली असता संपूर्ण नाल्यावर झाडं-झुडपं, गवत आणि कचरा यांचं अच्छादन पसरलं आहे.

पाणी वाहून जायला सुद्धा या नाल्यात जागा उरली नसून त्यामुळे अंबरनाथ नगरपालिका नालेसफाई करते की शहरवासीयांची थट्टा करते? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रत्यक्षात मे महिनाअखेरपर्यंत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करणं गरजेचं असताना आता जून महिना जवळपास अर्धा संपत आला, तरीसुद्धा नाले मात्र तुंबलेलेच असल्याचे पाहायला मिळतंय.

संबंधित बातमी :

Mumbai Rains : मुंबई आज रेड तर पुढील 4 दिवस ऑरेंज अ‍ॅलर्ट; मुख्यमंत्री तातडीने आपत्ती निवारण कक्षात

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.