AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rains : मुंबई आज रेड तर पुढील 4 दिवस ऑरेंज अ‍ॅलर्ट; मुख्यमंत्री तातडीने आपत्ती निवारण कक्षात

मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अ‍ॅलर्ट राजी करण्यात आला आहे. तसेच मुंबईत चार दिवस ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच पावसाने मुंबईला सकाळपासून झोडपल्याने मुंबईची दाणादाण उडाली आहे.

Mumbai Rains : मुंबई आज रेड तर पुढील 4 दिवस ऑरेंज अ‍ॅलर्ट; मुख्यमंत्री तातडीने आपत्ती निवारण कक्षात
cm uddhav thackeray
| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 4:02 PM
Share

मुंबई: मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अ‍ॅलर्ट राजी करण्यात आला आहे. तसेच मुंबईत चार दिवस ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच पावसाने मुंबईला सकाळपासून झोडपल्याने मुंबईची दाणादाण उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षात येऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना अ‍ॅलर्ट राहण्याच्या सूचनाही दिल्या. (Red Alert Issued for Mumbai Today, cm uddhav thackeray visits bmc’s disaster control room)

मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी तुंबले असून वाहतुकीची कोंडी झाली आहे. वरळी आणि प्रभादेवीतील रस्ते पाण्यात गेले आहेत. हिंदमाता येथे अडीच फुट पाणी साचले आहे. तसेच सायन आणि चुनाभट्टी येथे रेल्वेरुळावर पाणी भरल्याने लोकल ठप्प झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाला भेट देऊन मुंबईतील परिस्थितीची पाहणी केली. महापालिकेने मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्याचं कंट्रोल आपत्ती निवारण कक्षात आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती निवारण कक्षात येऊन मुंबईतील विविध भागांची पाहणी केली.

पाच मिनिटात झटपट आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दादर टीटी किंवा हिंदमाता येथे पाहणी करण्यासाठी न येता ते थेट पालिकेच्या आपत्ती निवारण कक्षात आले. या कक्षातून त्यांनी अवघ्या पाचच मिनिटात संपूर्ण मुंबईचा आढावा घेतला. मानखुर्दमधील नव्या उड्डाण पुलाखाली पाणी भरले होते. त्याची माहितीही त्यांनी यावेळी घेतली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबतची माहिती दिली. यावेळी महानगरपालिकेच्या सभागृह नेता विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) प्रभात रहांगदले, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर हे उपस्थित होते.

कोकण किनारपट्टीला रेड अ‍ॅलर्ट

आज 9 तारखेला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. बहुतांशी भागात पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड तर काही ठिकाणी ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या चार ते पाच दिवसात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार होणार आहे, असं हवामान खात्याच्या प्रादेशिक विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिली सांगितलं.

मुंबईत पाच दिवस पावसाचेच

कोकण किनारपट्टीनंतर मुंबईत आज रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या चार दिवसांसाठी मुंबईत ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तरीही पाचही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहितीही शुभांगी भुते यांनी दिली आहे. (Red Alert Issued for Mumbai Today, cm uddhav thackeray visits bmc’s disaster control room)

संबंधित बातम्या:

Mumbai Rains : म्हणून मुंबई तुंबणारच, महापालिका आयुक्त चहल यांनी कारण सांगितलं!

Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर

पहिल्याच पावसात मुंबईची ‘तुंबई’; मुख्यमंत्री ठाकरेंकडून तातडीचे आदेश

(Red Alert Issued for Mumbai Today, cm uddhav thackeray visits bmc’s disaster control room)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.