Kalyan : कल्याणमध्ये वीज बिल कमी करण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणारा भामटा गजाआड

Kalyan : कल्याणमध्ये वीज बिल कमी करण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणारा भामटा गजाआड
कल्याणमध्ये वीज बिल कमी करण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणारा भामटा गजाआड

कुणाचे 40 हजार, कुणाचे 50 हजार, कुणाचे 30 हजार अशी बिले आली होती. ही बिले कमी करून देतो, महावितरणमध्ये माझी ओळख आहे असे सांगत जवळपास 23 जणांकडून बिल भरण्यासाठी रक्कम घेतली. इतकेच नव्हे तर महावितरणमध्ये बिल भर यासाठी स्वतःच्या खात्याचा वापर करत चेक दिला.

अमजद खान

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 16, 2022 | 4:39 PM

कल्याण : लॉकडाऊननंतर नागरिकांना भरमसाठ लाईट बिलं आली होती. बिल भरण्यासाठी नागरिकांची महावितरण कार्यालयात एकच गर्दी होती. बिल कसे कमी होणार यासाठी लोक प्रयत्न करत होते. लोकांच्या या मानसिकतेचा फायदा एका भामट्याने उचलला. या भामट्याने अनेक लोकांकडून बिल कमी करण्याच्या नावाने पैसे उचलले. महावितरणला आपल्या नावावर चेक देखील दिला. चेक बाउन्स झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अखेर साहिल पटेल नावाच्या भामट्याला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात महावितरणकडून काही महिन्यांचे बिल घेतल गेलं नाही. लॉकडाऊननंतर महावितरणकडून वीज बिल आकारणी सुरु केली. नागरिकांना भरमसाठ बिल आले होते. एकीकडे लॉकडाऊन दुसरीकडे भरमसाठ विज बिल आल्याने नागरिक त्रस्त होते. महावितरणच्या कार्यलयात बिल कमी करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. नागरिक महावितरण कार्यालयात वीज बिल कमी करण्यासाठी व भरण्यासाठी रांगा लावत होते. याच गर्दीत एक तरुण काही लोकांना भेटला.

चेक बाऊन्स झाल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तपास केला

कुणाचे 40 हजार, कुणाचे 50 हजार, कुणाचे 30 हजार अशी बिले आली होती. ही बिले कमी करून देतो, महावितरणमध्ये माझी ओळख आहे असे सांगत जवळपास 23 जणांकडून बिल भरण्यासाठी रक्कम घेतली. इतकेच नव्हे तर महावितरणमध्ये बिल भर यासाठी स्वतःच्या खात्याचा वापर करत चेक दिला. मात्र हा चेक बाऊंस झाल्याने महावितरण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा ही बाब समोर आली. या तरुणाने अनेक जणांना बिल कमी करून देण्याचा बहाण्याने पैसे उकळून फसवले होते. या प्रकरणी मार्च 2021 मध्ये कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. सात महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी साहिल पटेल याला शोधून अटक केली आहे. साहिल पटेल याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने अशा प्रकारे अजून किती जणांना फसवले आहे याचा तपास पोलीस करत आहेत. (Accused of cheating citizens under the pretext of reducing electricity bill in Kalyan)

इतर बातम्या

Sangli : सांगलीत आंतरजातीय विवाह केल्यामुळे 150 दाम्पत्य बहिष्कृत, नंदीवाले समाजाच्या सहा जात पंचांविरुद्ध गुन्हे दाखल

KDMC Crime | प्राणघातक हल्ल्यात व्यापारी जखमी, भाजपच्या माजी नगरसेवकास बेड्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें