‘अजित पवार मंत्री पाडवी यांना घालूनपाडून बोलायचे, आदिवासी असले म्हणून…’, जितेंद्र आव्हाड यांचा गौप्यस्फोट

"आघाडीत तोलून मापून सर्वांना सोबत घेऊन चालायचं असतं. पण अजित पवार यांचा तसा स्वभावच नाही. अजित पवार यांनी वेळोवेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांचा केलेला अपमान आम्ही सर्वांनी बघितला आहे", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

'अजित पवार मंत्री पाडवी यांना घालूनपाडून बोलायचे, आदिवासी असले म्हणून...', जितेंद्र आव्हाड यांचा गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 10:00 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संबंधित दावा केला. “अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दादागिरी होती. त्यांच्याविरोधात एकही माणूस ब्र शब्द सुद्धा काढायचा नाही. ते त्यांना घाबरुन नाही तर उगाच याबाबतची तक्रार शरद पवारांकडे गेली तर, शरद पवार नाराज होतील म्हणून त्यांना कोणीच बोलायचं नाही. आता तसं नाहीय. आता इथे ना शरद पवार आहेत, ना कोण कुणाला घाबरणार आहे, म्हणून मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले ना, नालायक का काहीतरी. मंत्री तानाजी सावंत म्हणाले, उलट्या होतात”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“आघाडीत तोलून मापून सर्वांना सोबत घेऊन चालायचं असतं. पण अजित पवार यांचा तसा स्वभावच नाही. अजित पवार यांनी वेळोवेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांचा केलेला अपमान आम्ही सर्वांनी बघितला आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण असो, काँग्रेस नेते अशोक चव्हाण असो यांचा केलेला अपमान तथा सहकारी मंत्र्यांना जी तुच्छ वागणूक मिळायची हे सर्वांनी अनुभवलेलं आहे. फक्त शरद पवारांमुळे कुणीच हिंमत दाखवत नव्हतं की, तक्रार करावी”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

‘के. सी. पाडवी यांना एवढं घालूनपाडून बोलायचे की…’

“अजित पवार यांच्याबरोबर काम केलेल्या प्रत्येक मंत्र्यांना तुम्ही विचारा. बघा ते काय बोलतात. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारा, काँग्रेस नेते नितीन राऊत, मंत्री के. सी. पाडवी यांना विचारा. ते तुम्हाला सविस्तर सांगतील. के. सी. पाडवी यांना एवढं घालूनपाडून बोलायचे की, आम्हालाच लाज वाटायची. अरे ते कॅबिनेट मंत्री आहेत, आदिवासी असले म्हणून काय झालं?”, असा धक्कादायक गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला.

‘अजित पवार आणि शरद पवार यांच्यात तुलना होऊ शकत नाही’

“धर्मराव बाबा आत्रम यांच्या घरी काय चालतं, मात्र ते अजून राजकारणात यायचे आहेत. त्यांनी एकही निवडणूक लढवली नाही. इथे चार-पाच वेळा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करून झालं होतं. एकदा खासदार आणि सहा वेळा विधानसभा निवडून झाले होते. सगळीकडे चेहरा शरद पवारांचा होता. अजित पवार म्हणजेच शरद पवार, असं लोक मानायचे. मी पण मानायचो. पण त्यांची तुलना होऊ शकत नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?.
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?.
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल.
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?.
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला...
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला....
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?.
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?.
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.