ठाणे मध्यवर्ती कारागृहातील आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे स्मारकाचे नुतनीकरण होणार, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून पाहणी

ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी तुरुंगवास भोगला आहे. याच कारागृहामध्ये राघोजी भांगरे या आदिवासी समाजातील क्रांतीकारकास फाशी देण्यात आली होती.

ठाणे मध्यवर्ती कारागृहातील आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे स्मारकाचे नुतनीकरण होणार, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून पाहणी
राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचं नुतनीकरण


ठाणे: ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी तुरुंगवास भोगला आहे. याच कारागृहामध्ये राघोजी भांगरे या आदिवासी समाजातील क्रांतीकारकास फाशी देण्यात आली होती. मात्र, या क्रांतीवीराचे स्मारक अडगळीत गेले असल्याने त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारागृहास भेट देऊन पाहणी केली. तसेच, स्मारकासाठी कारागृहाच्या आवारातील जागा निश्चित केली.

स्मारक खुलं राहणार

विशेष म्हणजे, हे स्मारक सामान्य जनतेसाठी खुले ठेवण्यात येईल, अशी घोषणाही जितेंद्र आव्हाड यांनी केली.आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन या स्मारकाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर अजितदादा पवार यांनी आव्हाड यांना या संदर्भात लक्ष घालण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याच अनुषंगाने जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे मध्यवर्ती कारागृहात पाहणी केली.

राघोजी भांगरेंच्या स्मारकाचं काम लवकर पूर्ण व्हावं

राघोजी भांगरे हे आदिवासी समाजासाठीचं नाहीतर इतर समाजासाठी, देशासाठी लढा दिला आहे. राघोजी भांगरे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांच्या स्मारकाचं काम लवकर पूर्ण व्हावं, अशी अपेक्षा सुनील भांगरे यांनी व्यक्त केली आहे. ठाणे कारागृह प्रशासनानं दिलेली जागा आम्हाला मान्य असल्याचंही सुनील भांगरे यांनी सांगितलं आहे. 2 मे रोजी राघोजी भांगरे यांच्या स्मृतीदिनाच्या दिवशी सामान्य लोक याठिकाणी येऊन दर्शन घेऊ शकतात, असं भांगरे यांनी सांगितलं आहे.

दोन वर्षांपासून राघोजी भांगरे यांचं स्मारक खराब झाल्याचं कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. अजित पवार यांच्या सूचनेनुसार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज भेट दिली आहे, असं आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हंसराज खेवरा, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राघोजी भांगरे यांचे वंशज सुनील भांगरे यांच्यासोबत स्मारक परिसराची पाहणी केली. यावेळी कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांच्याशी या स्मारकाच्या उभारणीबाबत चर्चा केली.

इतर बातम्या:

देशात लोकशाही उरली आहे का? संजय राऊतांचा सवाल; राहुल गांधींसोबत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर घटस्थापनेपासून भाविकांसाठी खुले, रोज किती भाविकांना दर्शन मिळणार?

Jitendra Awhad visit Thane Central Jail to take review for development of Raghoji Bhangre Memorial

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI