AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर घटस्थापनेपासून भाविकांसाठी खुले, रोज किती भाविकांना दर्शन मिळणार?

पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही 7 ऑक्टोबरपासून भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. मंदिर समितीची बैठक आज पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी मंदिर समितीकडून एक नियमावलीही तयार करण्यात आली आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर घटस्थापनेपासून भाविकांसाठी खुले, रोज किती भाविकांना दर्शन मिळणार?
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 5:49 PM
Share

पंढरपूर : घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळं उघडणार आहेत. पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही 7 ऑक्टोबरपासून भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. मंदिर समितीची बैठक आज पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी मंदिर समितीकडून एक नियमावलीही तयार करण्यात आली आहे. त्यानुसार रोज 10 हजार भाविकांनाच विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेता येणार आहे. (Vitthal Rukmini Temple in Pandharpur will open for devotees from Navratri festival)

घटस्थानपेपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुलं असणार आहे. रोज 10 हजार भाविकांना मुख दर्शन घेता येणार आहेत. त्यातील 5 हजार भाविकांना ऑनलाईन पासद्वारे दर्शन घेता येईल. तर 5 हजार भाविकांना ऑफलाईन पद्धतीने दर्शन मिळणार आहे. तर पंढरपूरमधील भक्तांना सकाळी 6 ते 7 असा वेळ राखून ठेवण्यात आलाय. प्रत्येक तासाला 1 हजार भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान 65 वर्षावरील नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर मंदिरात फुलं, हार आणि प्रसाद घेऊन जाण्यास मनाई करण्यात आलीय. मंदिर प्रशासनाकडून मंदिर उघडण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

घटस्थापनेपासून साई मंदिरही खुलं होणार

7 ऑक्टोबरपासून साई मंदिर भक्तांसाठी खुले होणार आहे. या पार्श्वभूमीवर साई संस्थानकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संस्थानच्या नियमावलीनुसार दररोज 15 हजार भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. त्यात सर्व भक्तांना ऑनलाईन नोंदणीद्वारेच मोफत दर्शन मिळणार आहे. दर तासाला दीड हजार भाविकांना दर्शनाचा लाभ मिणार आहे.

साई मंदिरात दर्शन पास ऑनलाईन पद्धतीनेच दिले जाणार आहेत. 15 हजार भाविकांना ऑनलाईन पास असेल तरच दर्शन मिळणार आहे. ऑफलाईन पास न देण्याचा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. वाढत्या कोरोना स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा व रेस्टॉरंट वगळता सर्व आस्थापना रात्री 8.30 पर्यंतच सुरु राहणार आहेत. तर प्रसादालय बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. online.sai.org.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन पास घेतल्यावरच दर्शन मिळणार आहे.

आई रेणुकेचा माहूर गडही सज्ज

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर येथील रेणूका मातेच्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. या उत्सवानिमित्त तहसील कार्यालयात सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली. येत्या 07 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून दोन वर्षानंतर गडावर यात्रा भरणार असल्याने प्रशासनाकडूनही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी काळजी घेण्यात येत आहे.

इतर बातम्या :

देशात लोकशाही उरली आहे का? संजय राऊतांचा सवाल; राहुल गांधींसोबत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

हसन मुश्रीफांवर अजून एक गंभीर आरोप, घोटाळ्यात सतेज पाटलांनी मदत केल्याचा दावा!

Vitthal Rukmini Temple in Pandharpur will open for devotees from Navratri festival

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.