Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मराठी लोक भिकारडे, चिकन मटन खावून, घाण करणारे’; कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला हिणवत जबर मारहाण

कल्याणच्या योगिधाम सोसायटीत मराठी कुटुंबावर झालेल्या निर्घृण हल्ल्याने संतापाची लाट उसळली आहे. अमराठी कुटुंबांमधील वादात हस्तक्षेप केल्यावर मराठी कुटुंबाला लोखंडी रॉड आणि इतर शस्त्रांनी मारहाण करण्यात आली. या घटनेत एका तरुणाच्या डोक्याला १० टाके पडले आहेत.

'मराठी लोक भिकारडे, चिकन मटन खावून, घाण करणारे'; कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला हिणवत जबर मारहाण
क्षुल्लक कारणावरुन कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला, वातावरण तापलं
Follow us
| Updated on: Dec 19, 2024 | 10:00 PM

मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. इथे देशभरातील वेगवेगळ्या भाषेचे, प्रांताचे नागरीक येऊन आपले स्वप्न साकार करतात. तसेच स्वप्न घेऊन येणाऱ्या आणि त्या दृष्टीने मार्गक्रमण करणाऱ्या प्रत्येक मेहनती व्यक्तीला ही मुंबई तितक्याच सहजतेने आपल्यात सामावून घेते आणि आपलसं देखील करते. पण याच मुंबईचा सख्खा पुत्र म्हणजेच मराठी माणसाची काय अवस्था झालीय की, या मराठी मातीतच त्याला विनाकारण नको त्या गोष्टींनी हिणवलं जात आहे. मराठी माणसाला त्याच्या भाषेवरुन हिणवलं जात आहे. एवढंच नाही तर किरकोळ कारणावरुन त्याच्या कुटुंबावर हल्ला केला जातोय. हा संतापजनक प्रकार घडलाय, मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या कल्याण शहरात. ही घटना त्याच कल्याणमध्ये घडलाय जिथली जमीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झाली आहे. पण याच कल्याणमध्ये एका स्वाभिमानी मराठी कुटुंबावर परप्रांतीय कुटुंबांनी बाहेरुन गुंड आणून कारण नसताना मारहाण केली. यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याण पश्चिमेतील एका हायप्रोफाईल सोसायटीत दोन अमराठी कुटुंबियांमध्ये भांडण सुरु होतं. या दोन्ही अमराठी कुटुंबियांमधील सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी शेजारे राहणारे मराठी कुटुंबातील व्यक्ती धीरज देशमुख यांनी हस्तक्षेप केला. यावेळी धीरज देशमुख यांनी दोन्ही कुटुंबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी एका अमराठी महिलेने तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात. चिकन मटन खावून घाण करणारे आहात, अशी शेरेबाजी केल्याने हा वाद वेगळ्या मार्गाला लागला. यानंतर अमराठी कुटुंबाने बाहेरुन माणसं मागवून मराठी कुटुंबियांच्या घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी शुक्ला नावाच्या व्यक्तीने लोखंडी रॉडने डोक्यात केलेल्या हल्ल्यामुळे एका तरुणाच्या डोक्यात तब्बल 10 टाके पडले आहेत. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

धीरज देशमुखांनी शांततेने वाद मिटवण्याचा केला प्रयत्न, पण…

कल्याण पश्चिमेतील योगिधाम परिसरातील आजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी रात्री घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. धूप आणि अगरबत्ती लावल्यावरून सुरू झालेला किरकोळ वाद गंभीर स्वरूप धारण करून मराठी कुटुंबाला हिंसाचारात ओढून नेला गेला. सोसायटीतील रहिवासी अखिलेश शुक्ला आणि लता कळविकट्टे यांच्यात धूप-धूर यावरून वाद झाला. वादात शुक्ला यांनी मराठी माणसांचा अपमान करणारे शब्द उच्चारले, ज्याचा विरोध करण्यासाठी धीरज देशमुख यांनी हस्तक्षेप केला. धीरज यांनी शांततेने वाद मिटवण्याचा प्रयत्न करत “मराठी माणसांचा अपमान करू नका” असे सांगितले.

हे सुद्धा वाचा

मंत्रालयात काम करतो अशी धमकी देत….

यामुळे संतापलेल्या अखिलेश शुक्ला याने “मी मंत्रालयात काम करतो, मला कोणीच रोखू शकत नाही,” असे म्हणत धीरज यांच्यावर शब्दिक हल्ला चढवला. पुढे, शुक्ला यांनी बाहेरून आठ-दहा जणांना बोलावून देशमुख कुटुंबावर हल्ला केला. धीरज यांचा भाऊ अभिजित देशमुख याला सोसायटीच्या गेटबाहेर बोलावून धारदार शस्त्राने डोक्यावर वार करण्यात आला. हल्ल्यात धीरज देशमुख यांच्या पत्नीवरही विनयभंग आणि मारहाणीचा प्रकार घडला. लोखंडी रॉड, लाकडी पट्टा आणि पाईपसारख्या वस्तूंचा वापर करून हल्लेखोरांनी कुटुंबाला मारहाण केली.

पोलीस कारवाईला उशिर झाल्याचा आरोप

घटनास्थळी गंभीर जखमी झालेल्या अभिजित देशमुख यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, खडकपाडा पोलीस ठाण्याने रात्री तातडीने कारवाई केली नसल्याने कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला, असा आरोप केला जातोय. याप्रकरणी गुरुवारी दुपारी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे. मराठी कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.