कोरोना वाढत असतानाही शाळा भरली, केडीएमसीकडून कारवाई

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन जे काही करु शकते ते सर्व करीत आहेत (School Open In Corona).

  • अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण-डोंबिवली
  • Published On - 15:30 PM, 25 Feb 2021
कोरोना वाढत असतानाही शाळा भरली, केडीएमसीकडून कारवाई
Kalyan School Open

कल्याण : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन जे काही करु शकते ते सर्व करीत आहेत (School Open In Corona). कल्याण-डोंबिवली महापालिका एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट होता. गेल्या चार दिवसांपासून केडीएमसी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या तीन महिन्यात कालचा आकडा सर्वात मोठा आकडा 165 होता. तरी पण काही बेजबाबदार लोक हे समजायला तयार नाहीत (School Open In Corona).

कल्याणमधील नामांकित एम. जे. बी. कन्या शाळेच्या दहावीचा वर्ग आज भरला होता. जेव्हा महापालिकेचे अधिकारी शाळेत पोहोचले. तेव्हा मुली बाहेर आलेल्या होत्या. त्यांच्या तोंडावर आधी मास्क नव्हता, नंतर कॅमेरा दिसल्यानंतर शाळेच्या शिक्षकांनी मुलींना मास्क लावायला सांगितले.

केडीएमसीचे प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांचे म्हणणे आहे की, आमच्याकडून कारवाई केली जात आहे. एका दिवसासाठी मुलींना बोलावून घेतले होते. मात्र, ही शाळा दररोज भरते अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 62,351 रुग्ण

कल्याण-डोंबिवलीत आज 165 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, दोघांचा आज मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 98 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या 62,351 वर पोहोचली आहे. यामध्ये 1,284 रुग्ण उपचार घेत असून, 59,905 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, आतापर्यंत 1,162 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

School Open In Corona

संबंधित बातम्या :

Washim Corona Updates : पोहरादेवीच्या महंतासह कुटुंबातील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह

Washim Corona Updates : वाशिममध्ये 229 विद्यार्थ्यांना कोरोना, प्रशासन खडबडून जागं

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा भडका, तब्बल 8807 नवे रुग्ण, पिंपरीत लस घेतलेल्या तिघांना कोरोना