Washim Corona Updates : पोहरादेवीच्या महंतासह कुटुंबातील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह

Washim Corona Updates : पोहरादेवी मंदिराच्या महंताच्या कुटुंबातील पाच जण, आणखी तिघे जण, असे एकूण 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत (Poharadevi Mahant Positive)

Washim Corona Updates : पोहरादेवीच्या महंतासह कुटुंबातील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 1:41 PM

वाशिम : पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्यासह कुटुंबातील पाच जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनात हजारो नागरिक उपस्थित होते. त्याच वेळी कोरोना संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गावातील एकूण पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. (Washim Corona Updates Poharadevi Mahant family tested COVID Positive)

पोहरादेवी मंदिराच्या महंताच्या कुटुंबातील पाच जण, आणखी तिघे जण, असे एकूण 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आरोग्य विभागाने 22 फेब्रुवारीला केलेल्या तपासणीच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पोहरादेवी गडावर गर्दी

वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवार 22 फेब्रुवारीला वाशिममधील पोहरादेवीचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यानंतर विरोधकांनी राठोडांवर टीकेची झोड उठवली. त्यावर आपण कोणालाही निमंत्रण दिले नव्हते, समर्थकांनीच गर्दी केली, असं म्हणत हात झटकले होते.

उद्धव ठाकरेंच्या नाराजीची चर्चा

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीमध्ये झालेल्या गर्दीच्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. तसेच वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना याचा अहवाल द्यावा, अशा सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत

पोहरादेवी गडावरील गर्दीवरुन टीका

कोरोनाच्या काळात पोहरादेवीत गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन केल्यामुळे संजय राठोड पक्षनेतृत्त्वाच्या मनातून उतरल्याची चर्चा आहे. विशेष महाविकासआघाडीचे शिल्पकार आणि आधारस्तंभ शरद पवार यांनीही या सगळ्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूजा चव्हाण प्रकरणात टीकेचा भडीमार रोखण्यासाठी अधिवेशनाच्या तोंडावर संजय राठोड यांचा राजीनामा घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

वाशिमच्या शाळेत 229 विद्यार्थी कोरोनाबाधित

वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील देगावमधील निवासी शाळेतील चार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणारे 229 विद्यार्थी दोन दिवसात कोरोनाबाधित (Washim School Students Corona Positive) आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी तातडीने निवासी शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार आणि इतर आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत सूचना केल्या.

संबंधित बातम्या :

नियम सर्वांना सारखेच, पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

(Washim Corona Updates Poharadevi Mahant family tested COVID Positive)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.