तो दोन दिवसांपासून तिच्या मृतदेहाशेजारीच बसून, आई गेल्याचे पण 14 वर्षाच्या मुलाला नाही कळलं, कुठं घडली ही घटना

आईचा झोपतेच मृत्यू झाला. तर 14 वर्षांचा मुलगा दोन दिवसांपासून तिच्या जवळच बसून होता. या मुलाला आई गेल्याची कल्पनाच नव्हती. शेजाऱ्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी पोलिसांना याविषयीची माहिती दिली, तेव्हा ही हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली.

तो दोन दिवसांपासून तिच्या मृतदेहाशेजारीच बसून, आई गेल्याचे पण 14 वर्षाच्या मुलाला नाही कळलं, कुठं घडली ही घटना
Follow us
| Updated on: Aug 02, 2024 | 1:06 PM

कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील एका इमारती मध्ये राहणाऱ्या 44 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला .धक्कादायक म्हणजे तिच्या 14 वर्षाचा मुलाला आईचा मृत्यू झाला याची कल्पनाच नव्हती. हा मुलगा दोन दिवस आईच्या मृतदेहाशेजारी बसून होता. शेजाऱ्यांना दुर्गंधी आल्याने त्यांना संशय आला .त्यांनी याबाबत खडकपाडा पोलिसांना माहिती दिली आणि हृदय हेलावून टाकणारी घटना उघड झाली .

सेल्विया डेनीयल ही महिला पती डेंनीयल आणि 14 वर्षाचा मुलगा मुलगा ऑलविन यांच्यासोबत कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा येथील सुंदर कॉम्प्लेक्स मध्ये राहत होती. दोन दिवसापूर्वी सेल्विया यांचे पती कामानिमित्त काही दिवसांसाठी बाहेर गेले. सेल्विया आणि मुलगा ऑलवीन हे घरात होते. घरात झोपी गेलेल्या सेल्विया यांचा झोपेतच मृत्यू झाला. मात्र त्याची काहीच माहिती कोणाला कळाली नाही. 14 वर्षाचा मुलाला आईचा मृत्यू झाला याची कल्पनाच नव्हती. हा मुलगा दोन दिवस आईच्या मृतदेहाशेजारी बसून होता.

दुर्गंधी सुटल्यानंतर घटना उघडकीस

हे सुद्धा वाचा

सेल्विया डेनीयल यांचा झोपेतच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा त्यांच्या शेजारीच बसून होता. त्याला आई गेल्याची काहीच कल्पना नव्हती. दोन दिवस तो आईजवळच होता. दोन दिवसानंतर घरातून दुर्गंधी सुटली. शेजारी राहणाऱ्यांनी दार ठोठावले. मात्र आतून काही प्रतिसाद येत नव्हता. शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत खडकपाडा पोलिसांनी माहिती दिली.

अखेरीस पोलिसांनीही दार ठोठावून पाहिले. आतून प्रतिसाद येत नसल्याने पोलिसांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला. पोलिसांनी आत प्रवेश करताच त्यांना धक्काच बसला. घरात एक महिला मृतावस्थेत पडून होती. तिच्या शेजारी एक मुलगा बसला होता. महिला सेल्वीया ही झोपत मृत्यूमुखी पडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र तिच्या शेजारी तिचा मुलगा ऑलविन दोन दिवसापासून बसून होता. त्याला आईचा मृत्यू झाला हे कळले नाही.

मुलाची मानसिक स्थिती नाही ठीक

पोलिसांनी मुलाची प्राथमिक विचारपूस केली असता त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समोर आले. या मुलाने पोलिसांना काहीच प्रतिसाद दिला नाही. तो आईकडे बघत होता. गेल्या दोन दिवसांपासून तो आईच्याच जवळ बसून होता. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनाकरीता महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविला आहे. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे ? याचे कारण समोर येणार आहे.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...