AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नियम बदलले, कल्याण-डोंबिवलीत आता दुकाने 4 वाजेपर्यंतच, बसमध्ये उभं राहून प्रवास करता येणार नाही

कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका पाहता राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार कल्याण-डोंबिवलीतही आता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत (KDMC Commissioner Vijay Suryawanshi declare new restriction for Kalyan Dombivali amid corona virus)

नियम बदलले, कल्याण-डोंबिवलीत आता दुकाने 4 वाजेपर्यंतच, बसमध्ये उभं राहून प्रवास करता येणार नाही
केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 6:19 PM
Share

कल्याण (ठाणे) : कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका पाहता राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार कल्याण-डोंबिवलीतही आता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सोमवारपासून निर्बंधांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून केडीएमसी हद्दीत लेव्हल तीन अंतर्गत सोमवारपासून (28 जून) अनलॉकच्या निर्बंधात बदल करण्यात आले आहेत. हे बदल 5 जुलैपर्यंत असतील, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे (KDMC Commissioner Vijay Suryawanshi declare new restriction for Kalyan Dombivali amid corona virus).

केडीएमसी हद्दीत पुढच्या आठवड्यात नेमकं काय सुरु, काय बंद?

1) अत्यावश्यक सेवेतील  दुकाने आणि आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेर्पयत सुरु राहतील.

2) अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानेही सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेर्पयत खुली राहतील. ही दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद ठेवण्यात येतील.

3) मॉल्स, थिएटर, चित्रपटगृहे पूर्णपणे बंद राहतील.

4) हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत भोजनासाठी 50 टक्के आसन क्षमतेनुसार सुरु राहतील. तसेच 4 वाजल्यानंतर होम डिलिव्हरी आणि पार्सल सेवा बंधनकारक राहील.

5) सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे, सायकलिंग, खेळ यासाठी पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेचा वेळ देण्यात आला आहे.

6) खाजगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सरकारी कार्यालयांना 50 टक्के क्षमतेची मर्यादा असेल.

7) सामाजिक, राजकीय, मनोरंज सभारंभ सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने करता येतील. लग्नास 50 व्यक्तींना उपस्थीत राहण्याची अनुमती आहे.

8) सार्वजनिक बस वाहतूक शंभर टक्के क्षमतेने सुरु राहिल. उभे राहून प्रवास करता येणार नाही.

9) एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खाजगी बस, कार, टॅक्सीने जाण्यासाठी ई पास लागेल.

(KDMC Commissioner Vijay Suryawanshi declare new restriction for Kalyan Dombivali amid corona virus)

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी ! पुण्यात संध्याकाळी 5 नंतर संचारबंदी लागू, दुकानं 4 वाजेपर्यंतच सुरु राहणार, नवी नियमावली जारी

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.