कल्याण-डोंबिवलीत येत्या आठवड्यापासून अनधिकृत बांधकांमावर हातोडा; किती बांधकामे तोडणार?

अनिधिकृत बांधकामावरून कोर्टाने फटकारल्यानंतर अखेर कल्याण-डोंबिवली महापालिका खडबडून जागी झाली आहे. महापालिकेने येत्या आठवड्यापासून शहरातील अनधिकृत बांधकामे तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्याण-डोंबिवलीत येत्या आठवड्यापासून अनधिकृत बांधकांमावर हातोडा; किती बांधकामे तोडणार?
kdmc
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 4:34 PM

कल्याण: अनिधिकृत बांधकामावरून कोर्टाने फटकारल्यानंतर अखेर कल्याण-डोंबिवली महापालिका खडबडून जागी झाली आहे. महापालिकेने येत्या आठवड्यापासून शहरातील अनधिकृत बांधकामे तोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी येणारा खर्च संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. हे आयुक्तांनी सुद्धा मान्य केले आहे. शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत हायकोर्टाने केडीएमसीला फटकारले आहे. त्यानंतर या बांधकामाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 3 महिन्या महापालिका हद्दीतील सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करणार येत्या आठवडय़ापासून ही कारवाई सुरु केली जाईल, असं आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी सांगितलं.

एमआरटीपीए अंतर्गत गुन्हा

ज्यांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत त्यांच्या विरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच बांधकाम तोडण्यासाठी महापालिकेला येणारा खर्च वसूल केला जाईल. ज्या मालकाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आले. त्या जागा मालकाकडून दंड वसूल केला जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. या संदर्भात कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे आणि उमेश माने पाटीलसह सर्व पोलिस अधिकारी महापालिकेचे सर्व उपायुक्त, प्रभाग अधिकारी यांच्यासोबत आज आयुक्तांनी बैठक घेतली. या बैठकीस वीज वितरण कंपनीचे अधिकारीही उपस्थित होते.

20 हजार बांधकामांवर हातोडा?

महापालिका हद्दीत जवळपास 20 हजार अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या सर्व बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. महापालिका आयुक्तांनी अनधिकृत बांधकामावर पुढच्या आठवड्यापासून हातोडा पाडणार असल्याची घोषणा केल्यानंतर या परिसरातील नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.

 

संबंधित बातम्या:

Bhiwandi Crime | 14 वर्षीय मोलकरणीवर जंगलात अत्याचार, भिवंडीत मालकाला अटक

Video| भिवंडीत घराच्या समोर पार्क केलेली रिक्षा चोरीला, घटना सीसीटीव्हीत कैद

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात जेष्ठ नागरिकांना साडेपाच कोटींचा गंडा, जास्त परताव्याचं आमिष देत केली फसवणूक