ठाण्यात महाविकास आघाडीचा ‘जनप्रक्षोभ’ मोर्चा, बड्या नेत्यांचा सहभाग, प्रचंड गर्दी, पाहा Live

ठाण्यात महाविकास आघाडीकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चाला प्रचंड गर्दी झालीय. शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चाला ठाणेकरांनीदेखील उत्सफूर्त प्रतिसाद दिलायय.

ठाण्यात महाविकास आघाडीचा 'जनप्रक्षोभ' मोर्चा, बड्या नेत्यांचा सहभाग, प्रचंड गर्दी, पाहा Live
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 4:56 PM

ठाणे : ठाण्यातलं राजकारण गेल्या तीन दिवसांपासून तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या (Shiv Sena) महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. या मारहाणीत रोशनी शिंदे (Roshni Shinde) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस या प्रकरणाचा तक्रार करत आहेत. याउलट रोशनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी त्यांच्या विरोधात दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच प्रकरणी महाविकास आघाडीने ठाण्यात आज भव्य मोर्चा काढला आहे.

उद्धव ठाकरे यांनी काल सपत्नीक रोशनी शिंदे यांची ठाण्यात येऊन भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तालयाला भेट देत आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. तसेच उद्धव ठाकरेंनी आक्रोश मोर्चाची घोषणा केली होती. त्यानंतर आज ठाण्यात महाविकास आघाडीचा मोर्चा निघाला.

हे सुद्धा वाचा

या मोर्चाला ठाणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. या मोर्चात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, खासदार विनायक राऊत, राजन विचारे यांच्यासह काँग्रेसचे देखील सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. या मोर्चात प्रचंड गर्दी बघायला मिळतेय.

आदित्य ठाकरे काय बोलणार?

ठाण्यात तलावपाळी ते पोलीस आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आलाय. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात पोलिसांची आणि सरकारच्या भूमिकेविरोधात महाविकास आघाडीने हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेत्यांनी आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी वंदन करत पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर हा मोर्चा पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर दाखल झाला. तिथे सभा आयोजित करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे नेते जनसभेला संबोधित करणार आहेत.

ठाण्यातल्या महिला मारहाण प्रकरणावरुन उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपकडून अतिशय टोकाची टीका करण्यात आली. या टीका-टीप्पणीत महाराष्ट्राचं राजकारण अतिशय खालच्या पातळीवर जाताना दिसत आहेत. असं असताना आता भाजप नेत्यांच्या टीकेला आदित्य ठाकरे कसं प्रत्युत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.