भाजप नेते नारायण राणे यांची मोठी मागणी, सामना बंद करण्यासाठी आक्रमक, नेमकी मागणी काय?

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका करत असतांना सामनाबाबत मोठी मागणी केली आहे.

भाजप नेते नारायण राणे यांची मोठी मागणी, सामना बंद करण्यासाठी आक्रमक, नेमकी मागणी काय?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 3:54 PM

मुंबई : भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सामना वृतपत्रावर हल्लाबोल करत बंद करण्याची मागणी केली आहे. मुंबई येथील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांनी मोठी मागणी केली आहे. त्यामध्ये नारायण राणे म्हणाले, सामनाला वृत्तपत्र म्हणणार नाही. महाराष्ट्र आणि देशाच्या हिताचे काय आहे हे सांगावं? सामना मध्ये जनतेच्या हिताचे काय आहे? सामना हे वृतपत्र चालू राहावं की नाही याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विचार करावा. प्रेस कौन्सिलमध्ये नोंद असते. त्याचे काही नियम असतात ते पाळत नाही म्हणत सामनाची मी तक्रार करणार असून कोर्टात जाणार असल्याची भूमिका नारायण राणे यांनी केली आहे.

याशिवाय नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून सामनासह उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना फडतुस म्हणत असशील तर तू महाफडतुस असल्याचा आरोप नारायण राणे यांनी एकेरी उल्लेख करत केला आहे.

जी महिला ओळखीच्या दवाखान्यात अॅडमिट झाली, ती गर्भवती नसल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. त्यामध्ये तिच्या पोटात कुठलीही इजा झालेली नसतांना उद्धव ठाकरे कुटुंबासह भेटायला गेले. बायकोला आणि मुलाला घेऊन गेले म्हणत टीका केली.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे एकटे कुठेही जाऊ शकत नाही म्हणत उद्धव ठाकरे यांनी डिलिव्हरीचं काम सुरू केलं का? असा सवाल उपस्थित करत नारायण राणे यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी शिवराळ भाषा वापरुन भाषण केलं, एखाद्या व्यक्तीबद्दल असूया असल्याचे दिसून आले असेही राणे यांनी म्हंटलं आहे.

मुख्यमंत्री असतांना अडीच वर्षात अडीच तास मंत्रालयात गेले नाही. गुंडगिरी का संपवली नाही. तेव्हा घरात बसून राहिले आणि आता बायकोला घेऊन कुणालाही भेटायला जातात. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतः काहीही करू शकत नाही असेही राणे म्हणाले.

ज्या देवेंद्र फडणवीस यांना फडतुस म्हणत आहे. त्या देवेंद्र फडणवीस यांच्यातील कोणतेही गुण उद्धव ठाकरे यांच्यात नाही म्हणत नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार असतांना कायदा सुव्यवस्था निर्माण झाली होती त्याचे काय म्हणत राणे यांनी हल्लाबोल केला आहे.

नारायण राणे यांनी यावेळेला सुशांत सिंग यांना का मारलं ? त्याची आत्महत्या नव्हती. ती हत्या होती असा आरोप केला आहे. याशिवाय दिशा सालियान ला का मारलं ? याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे असेही राणे म्हणाले आहे.

सचिन वाझे हा गुन्हेगार होता. तरीही त्याला कामावर घेऊन महत्वाचे खाते दिले. सचिन वाझे उद्धव ठाकरे यांचे जावई आहेत का? गुन्हेगारांना मदत करणारा व्यक्ति मुख्यमंत्री होतो हा महाराष्ट्रासाठी कलंक असल्याची टीकाही नारायण राणे यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.