AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आढेवेढे नाही, साकडे, अर्जव नाही, महादेव जानकर खुल्लम खुल्ला बोलले; म्हणाले, आपल्याच चौकात, आपली…

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. भाजपने शिंदे गटासोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर कोण किती जागा लढणार हे सुद्धा सांगितलं आहे. त्यामुळे जानकर यांनी ही घोषणा केली आहे.

आढेवेढे नाही, साकडे, अर्जव नाही, महादेव जानकर खुल्लम खुल्ला बोलले; म्हणाले, आपल्याच चौकात, आपली...
mahadev jankar Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 19, 2023 | 11:43 AM
Share

पालघर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप विधानसभेच्या 240 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे शिंदे गटाला फक्त 48 जागा मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिंदे गटात खळबळ उडाली आहे. तर भाजपच्या मित्र पक्षांनीही त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी कोणतेही आढेवेढे न घेता आपली थेट भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपने जागा वाटप जाहीर केलं आहे. त्यात आमचा विचार केला नाही. शिंदे गट आणि भाजप एकत्र मिळून निवडणूक लढणार असल्याचं दिसत आहे. त्यांना आम्हाला सोबत घेण्याची इच्छा दिसत नाही. त्यांना आम्हाला सोबत घ्यायचं नसेल तर हरकत नाही. आम्ही स्वबळावर लढू, असं महादेव जानकर म्हणाले. जानकर यांनी स्वबळावर लढण्याचा इशारा देऊन एक प्रकारे भाजपला इशाराच दिल्याचं सांगितलं जात आहे.

आपल्या चौकात, आपली औकात वाढवली पाहिजे. महाराष्ट्रात माझे आतापर्यंत चार आमदार झाले. आता आम्ही दोन आमदार आहोत. मी वरच्या सभागृहात आहे. दुसरा खालच्या सभागृहात आहे. 98 जिल्हा परिषदा आमच्याकडे आहेत. आसाम आणि कर्नाटकात एक जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आहे. गुजरातमध्ये माझे 28 नगरसेवक आहेत. चार राज्यात माझ्या पक्षाला टेक्निकली मान्यता मिळाली आहे. जर भाजपला आमची गरज वाटत नसेल तर आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. भाजपची इच्छा नसेलच आम्हाला घ्यायची. तर आम्ही वेगळे लढू. आम्ही त्यांच्या मागे लागायचो आणि त्यांनी नाही म्हणायचं… त्यापेक्षा आम्ही आमच्या ताकदीवर स्वतंत्र लढू, असं महादेव जानकर यांनी सांगितलं.

48 जागा लढवणार

आम्ही 48 जागा लढवणार आहोत. गुजरात आणि उत्तर प्रदेशात माझं युनिट चांगलं आहे. काल मी 110 उमेदवार उभे केले होते. त्यात एनसीपी आणि शिवसेनेपेक्षा अधिक मते मिळवली. तर तीन विधानसभेत काँग्रेसपेक्षा चांगली मतांची टक्केवारी मिळाली आहे. मी 1.3 व्होटिंग पर्सेंटच्या दिशेने गेलो आहे. आम्ही भाजपवर अवलंबून नाही. भाजपला गरज वाटली तर आम्हाला घेतील. नाही तर आम्ही आमचं स्वतंत्र लढणार आहोत. भाजप आणि शिंदे यांची युती होणार आहे. बावनकुळेंनी जागा वाटप जाहीर केलं. त्यामुळे त्यांची इच्छा आम्हालासोबत घेण्याची दिसत नाही, असंही ते म्हणाले.

आमच्या त्यांना शुभेच्छा

त्यांची आम्हाला सोबत घेण्याची इच्छा दिसत नाहीये. त्यामुळे आम्ही आमच्या ताकदीवर लढू. आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. माझं भाजप नेत्यांशी बोलणं झालं होतं. त्यांना पाच लोकसभेच्या जागा मागितल्या. विधानसभेला वेळ आहे. आमची जिथे औकात आहे. तिथेच मागितल्या आहे. जिथे नगरसेवक, जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आहेत, आमदार आहेत, तिथेच जागा मागितल्या. त्यांना आमचा प्रस्ताव मान्य नसेल आणि शिंदे साहेबांसोबतच त्यांना जायचं असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आम्ही स्वतंत्र लढू. आम्ही जिंकण्याच्या भूमिकेत असू तर काही ठिकाणी हरवण्याच्याची आमची ताकद उभी करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.