ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करत असताना अचानक जाळीत विषारी साप दिसला, महावितरण कर्मचाऱ्यांची तारांबळ

ठाणे घोडबंदर रोडवर पातलीपाडा परिसरात वीज खंडीत झाली होती. त्यामुळे महावितरणाचे कर्मचारी ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीसाठी आले होते. यावेळी काम करत असताना जाळीमध्ये हिरवा चापडा हा विषारी साप आढळला.

ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करत असताना अचानक जाळीत विषारी साप दिसला, महावितरण कर्मचाऱ्यांची तारांबळ
ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करत असताना अचानक जाळीत विषारी साप दिसला, महावितरण कर्मचाऱ्यांची तारांबळ

ठाणे : ठाणे घोडबंदर रोडवर पातलीपाडा परिसरात वीज खंडीत झाली होती. त्यामुळे महावितरणाचे कर्मचारी ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीसाठी आले होते. यावेळी काम करत असताना जाळीमध्ये हिरवा चापडा हा विषारी साप आढळला. यावेळी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी सर्पमित्र अभिलाष डावरे आणि सचिन सूर्यवंशी यांना संपर्क करुन बोलावण्यात आलं. सर्पमित्रांनी हिरवा चापडा सापाला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

अभिलाष डावरे यांनी आतापर्यंत बऱ्याच सापांना जीवनदान दिलं आहे. त्यांच्यामुळे वनविभाग, निसर्गाला, फायरब्रिगेड तसेच पोलिसांना मोठी मदत होत असते. सर्पमित्र अभिलाष डावरे यांनी कुठेही साप किंवा पक्षी आढळल्यास घाबरु नका त्वरित वनविभागाला किंवा सर्पमित्रांना संपर्क करा. कृपया सापांना आणि पक्ष्यांना त्रास देऊ नका. तसेच मारू नका, असं आवाहन जनतेला केलं आहे.

हिरवा चापडा सापाविषयी माहिती

चापडा किंवा हिरवा चापडा (शास्त्रीय नाव: Trimeresurus gramineus; इंग्लिश: Bamboo pit viper, बांबू पिट व्हायपर) हा विषारी जातीतील साप आहे. हा साप हिरव्या रंगाचा असून हे लहान झुडपांच्या फांद्यांवर, वेलींवर रहातात. हा साप अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देतो, असे सर्पमित्र अभिलाष डावरे यांनी सांगितले.

मुंबईत माहिम दर्गाजवळ भलामोठा अजगर

ठाण्यातील घटना ताजी असताना मुंबईतही माहिम दर्ग्याजवळ भलामोठा अजगर आढळून आला. हा अजगर अंदाजे 10 फूटाचा होता. याबाबत सर्पमित्र अतूल कांबळे यांना माहिती देण्यात आली. या दरम्यान कोळी बांधवांनी एका गोणीत अजगरला पकडलं. या अजगरला त्याच्या राहत्या घरी म्हणजेच जंगलात सोडून देण्यात आले.

हेही वाचा :

‘तो’ अपघात नाही, हत्याच ! अल्पवयीन प्रेयसीला पळवून आणलं, ट्रेनमध्ये 10 जणांनी संपवलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI