Omicron Update : चिंता वाढली, कल्याण डोंबिवलीत परदेशातून आलेल्या 6 जणांना कोरोना, ओमिक्रॉनच्या रुग्णाच्या प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची अपडेट

राज्यातील कोरोना विषाणूच्या (Corona Virus) ओमिक्रॉन वेरिएंटचा (Omicron) संसर्ग झालेला पहिला रुग्ण डोंबिवलीत (Dombivli) आढळला आहे. कल्याण डोंबिवलीत परदेशातून आलेले आणखी 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

Omicron Update : चिंता वाढली, कल्याण डोंबिवलीत परदेशातून आलेल्या  6 जणांना कोरोना, ओमिक्रॉनच्या रुग्णाच्या प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची अपडेट
कल्याण डोंबिवली कोविड सेंटर
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 9:45 AM

कल्याण डोंबिवली : राज्यातील कोरोना विषाणूच्या (Corona Virus) ओमिक्रॉन वेरिएंटचा (Omicron) संसर्ग झालेला पहिला रुग्ण डोंबिवलीत (Dombivli) आढळला आहे. संबंधित रुग्णाला काही त्रास नसल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे काळजी वाढवणारी बातमी समोर आली असून कल्याण डोंबिवलीत परदेशातून आलेले आणखी 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. परदेशातून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 6 जणांपैकी 4 जण नायजेरियाहून आलेले, 1 जण रशिया, तर 1 जण नेपाळहून आलेला आहे. या 6 पैकी 5 जण डोंबिवलीत राहणारे, तर एक जण कल्याणचा आहे. सर्व जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनाही कल्याणच्या आर्ट गॅलरी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून ओमिक्रॉंन आहे की नाही हे 7 दिवसात कळणार आहे.

ओमिक्रॉनचा ससंर्ग झालेल्या रुग्णाला त्रास नसल्याची माहिती

डोंबिवलीत राज्यातला पहिला ओमीक्रॉन रुग्ण आढळला असून यामुळे कल्याण-डोंबिवली शहरात मोठी खळबळ उडाली होती. या रुग्णाला सध्या कल्याणच्या आर्ट गॅलरी कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय. संबंधित रुग्णाती प्रकृती सध्या स्थिर असल्याचं समजतंय. तर त्याच्या संपर्कातील जवळपास 35 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे सध्या परिस्थिती काहीशी नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळतंय.

दक्षिण आफ्रिकेतून दुबईमार्गे भारतात

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून दुबईमार्गे भारतात आलेल्या या प्रवाशाला सौम्य स्वरूपाची लक्षणे जाणवत असल्यानं त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याची जनुकीय तपासणी केली असता त्याला ओमीक्रॉन व्हेरीयंटची लागण झाल्याचं शनिवारी संध्याकाळी समोर आलं आणि कल्याण-डोंबिवली शहरात मोठी खळबळ उडाली.

कोरोना लस न घेता विमान प्रवास

ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. 24 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला होता. इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.या रुग्णाच्या 12 अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि 23 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. या शिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.

इतर बातम्या:

Omicron update : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासन सतर्क; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य सुविधांचा आढावा

ओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे

Omicron infected patient health is stable another six people tested corona positive who return from foreign

Non Stop LIVE Update
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.