AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palghar Mob Lynching | पालघर साधू हत्याकांडप्रकरणी आतापर्यंत 208 जणांचा जामीन मंजूर,18 आरोपींचा अर्ज फेटाळला

पालघरमधील साधू हत्याकांड (गडचिंचले झुंडबळी) प्रकरणात अटक झालेल्या आणखी 14 जणांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. (Palghar Mob Lynching Granted Bail another 14 people)

Palghar Mob Lynching | पालघर साधू हत्याकांडप्रकरणी आतापर्यंत 208 जणांचा जामीन मंजूर,18 आरोपींचा अर्ज फेटाळला
thane court
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 7:26 AM
Share

ठाणे : पालघरमधील साधू हत्याकांड (गडचिंचले झुंडबळी) प्रकरणात अटक झालेल्या आणखी 14 जणांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.  ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने याबाबतचा आदेश दिला आहे. तर दुसरीकडे इतर 18 जणांचा जामीन अर्ज ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. एस. गुप्ता यांच्या दालनात याप्रकरणी सुनावणी पार पडली.  (Palghar Mob Lynching Granted Bail another 14 people)

एकूण 228 आरोपींना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर साधू हत्याकांडप्रकरणी एकूण 228 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. ज्यामध्ये 12 आरोपींचे वय 18 वर्षाखालील होते. त्यामध्ये 75 जणांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. तर हत्येप्रकरणी 808 संशयितांची चौकशी करण्यात आली होती.  गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या 194 आरोपींना ठाणे कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला होता.

आणखी 14 जणांचा जामीन मंजूर

यानंतर याप्रकरणी मंगळवारी जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. त्यावेळी आणखी 14 जणांचा जामीन मंजूर करण्यात आला. यामुळे जामीनावर सुटका झालेल्यांची संख्या 208 इतकी झाली आहे. तर इतर 18 जणांचा जामीन अर्ज ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंगळवारी नामंजूर केला आहे.

दरम्यान या हत्या प्रकरणात महाराष्ट्र सीआयडीने डहाणू कोर्टात 11 हजार पानांचे दोन स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात कोणतेही जातीय कारण नसून काही अफवा असल्याचा दावा सीआयडीने तपासणीत केला होता.

काय आहे प्रकरण?

गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला होता. 16 एप्रिल रोजी रात्री उशिरा इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहन चालकासह तिघे जण होते. दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली होती.

पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत 101 जणांना ताब्यात घेतलं होतं. यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते.

(Palghar Mob Lynching Granted Bail another 14 people)

संबंधित बातम्या : 

Palghar Mob Lynching | पालघर साधू हत्याकांड प्रकरणी अटकेतील आणखी 89 आरोपींना जामीन मंजूर

Palghar Mob Lynching | नेमकं त्या दिवशी काय घडलं? गृहमंत्री थेट गडचिंचलेत, घटनास्थळी जाऊन आढावा 

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल