AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता डोंबिवलीतही पोस्ट ऑफिस पास्टपोर्ट केंद्र, 50 लाख नागरिकांना होणार फायदा

डोंबिवलीत पोस्ट ऑफिस पास्टपोर्ट केंद्राचे केंद्रीय राज्यमंत्री देऊसिंग चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा आज (12 ऑक्टोबर) ऑनलाईन पद्धतीने पार पडला. यावेळी मंत्री चव्हाण यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाची स्तूती केली.

आता डोंबिवलीतही पोस्ट ऑफिस पास्टपोर्ट केंद्र, 50 लाख नागरिकांना होणार फायदा
SHRIKANT SHINDE
| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 9:56 PM
Share

ठाणे : डोंबिवलीत पोस्ट ऑफिस पास्टपोर्ट केंद्राचे केंद्रीय राज्यमंत्री देऊसिंग चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा आज (12 ऑक्टोबर) ऑनलाईन पद्धतीने पार पडला. यावेळी मंत्री चव्हाण यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाची स्तूती केली. तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी कामाबाबत बोलताना नाव न घेता विरोधकांचा समाचार घेतला. व्हिडीओ बनविणाऱ्यांनी व्हिडिओ बनवा आम्ही विकासकामे करु, असे शिंदे म्हणाले.

पोस्ट ऑफीस पास्टपोर्ट केंद्राचे उद्घाटन

मागील अनेक दिवसांपासून खासदार शिंदे पोस्ट ऑफिस पास्टपोर्ट केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. आज केंद्रीय राज्यमंत्री देऊसिंग चव्हाण यांच्या हस्ते ऑनलाईन  कार्यक्रम पार पडला. डोंबिवलीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. होते. यावेळी खासदार शिंदे प्रमुख पाहुणे होते. पोस्ट खात्याचे मुख्य अधिकारी हरीशचंद्र अग्रवाल, डॉ. राजेश गवांडे, ऐसीपी जे. डी. मोरे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे,माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे, राजेश कदम योगेश म्हात्रे तसेच आदी मान्यावरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

पासपोर्ट केंद्राचा 50 लाख लोकांना होणारा फायदा

डोंबिवली कल्याण, उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर कजर्त या भागातील 45 ते 50 लाख लोकांना या पोस्ट ऑफिस पास्टपोर्ट केंद्राचा फायदा होईल, असे मत खासदार शिंदे यांनी व्यक्त केले.

व्हीडीओ बनविणाऱ्यांना विरोधकांना खासदार शिंदे यांचा टोला

तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघात सुरु असलेल्या विविध कामाबाबत लोक आणि विरोधीपक्ष मीम्स आणि व्हिडीओ तयार करतात. याचा शिंदे यांनी समाचार घेतला. ” विरोधकांनी असेच व्हिडीओ तयार करावेत आमच्याकडून शुभेच्छा आहेत. व्हीडीओ तयार करुन काही होत नाही. ग्राऊंड लेव्हलवर राहून फॉलोअप घ्यावा लागतो. काम करावे लागते. विकासाची कामे आम्ही सुरुच ठेवणार. व्हीडीओ तयार करणाऱ्यांनी व्हीडीओ तयार करीत राहावे,” असे शिंदे म्हणाले.

दिवा, शीळ भागातील पाणी टंचाई लवकर दूर होणार

या कार्यक्रमात बोलताना दिवा शीळ या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न लवकरच दूर केला जाईल, असे आश्वसन त्यांनी दिले. “दिवा-शीळ या भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी ठाणे महापौर आणि आयुक्तांसोबत बैठक झाली आहे. त्याला दिव्याचे लोकप्रतिनिधी उपस्थिती होते. जुनी पाईपलाईन बदलण्याचे काम सुरु आहे. दिव्यातील नव्या पाईपलाईनचा विषय आहे. त्याठिकाणी नव्या पाईपलाईनचे काम सुरु झाले पाहिजे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहे. या संदर्भात लवकर अधिकाऱ्यांसोबत मोठी बैठक घेऊन पाण्याची समस्या दूर केली जाईल,” असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

इतर बातम्या :

एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, पत्नी मंदाकिनी खडसेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

फडणवीस दोन वर्षानंतरही मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नरंजनातच मग्न, काँग्रेसचा टोला; वास्तव स्वीकारण्याचा खोचक सल्ला

मानव विकास योजनेतील 231 कोटी 30 लाख मिळाले, 93 हजार एसटी कामगारांना सप्टेंबरचा पगार मिळणार

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.