AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC Power Issue : डोंबिवली, कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात शुक्रवारी वीज बंद, महापारेषणकडून देखभाल-दुरुस्तीचे काम

शुक्रवारी (11 फेब्रुवारी) सकाळी 8 ते दुपारी 1 दरम्यान 220 केव्ही पडघा ते पाल आणि 220 केव्ही पडघा ते जांभूळ दरम्यान वीजवाहिन्या (Power lines) देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यासंदर्भात वीज ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश पाठवून पूर्वकल्पना देण्यात येणार असून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

KDMC Power Issue : डोंबिवली, कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात शुक्रवारी वीज बंद, महापारेषणकडून देखभाल-दुरुस्तीचे काम
डोंबिवली, कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात शुक्रवारी वीज बंद
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 8:54 PM
Share

कल्याण : महापारेषणकडून अतिउच्चदाब वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने डोंबिवली, उल्हासनगर 2 आणि कल्याण पूर्व विभागातील महावितरणच्या काही ग्राहकांचा वीज पुरवठा (Power Supply) काही काळ बंद राहणार आहे. शुक्रवारी (11 फेब्रुवारी) सकाळी 8 ते दुपारी 1 दरम्यान 220 केव्ही पडघा ते पाल आणि 220 केव्ही पडघा ते जांभूळ दरम्यान वीजवाहिन्या (Power lines) देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यासंदर्भात वीज ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश पाठवून पूर्वकल्पना देण्यात येणार असून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. (Power outage in Dombivali, Kalyan East and some parts of Ulhasnagar on Friday)

डोंबिवलीत कुठे वीजपुरवठा बंद राहणार ?

डोंबिवली पश्चिमेतील पुढील भागांचा वीजपुरवठा सकाळी 8 ते दुपारी 1 दरम्यान बंद राहणार आहे. गरिबाचा पाडा व नवापाडा फिडर, तुकारामनगर फिडरवरील नव चेतन, सुदंरा कॉम्प्लेक्स, लक्ष्मण रेषा, मल्हार बंगलो, गावदेवी मंदिर, अंबरयोग, अयरेगावचा, सावरकर रोड, गोपाल नगर, गल्ली नंबर 1 आणि 2, पेंडसेनगर, टिळकनगर, पोस्ट ऑफिस चौक, आरपी रोड, संत नामदेव पथ, वसंतवाडी, चार रस्ता, गोपाळनगर 2, 3 व 4, जिजाई नगर, अंबिका नगर, गोग्रासवाडी, पाथर्ली रोड, शिखंडेवाडी, स्टार कॉलनी, मानपाडा रोड, आर अँड टी कॉलनी, संत समर्थ मठ, हनुमान मंदिर रोड, गांधीनगर, जुनी डोंबिवली, कोपर रोड येथे वीजपुरवठा बंद राहणार आहे.

कल्याणमध्ये कुठे वीजपुरवठा बंद राहणार ?

कल्याण पूर्व विभागातील नांदिवली, सांदप, भोपर, उसरघर, देसलेपाडा, सोनारपाडा, मानपाडा, ललीतकाटा, लोढा हेवन, कटाई, निळजे परिसर, हेदुटणे, घेसर, उंभर्ली, कोळे, घारीवली, भंडारी पाडा, वैभव नगरी, मिलापनगर, सुदर्शन नगर, एमआयडीसी रहिवासी परिसर, सागाव खालचा पाडा व वरचा पाडा, चेरा नगर, शंखेश्वर नगर, भगवान पाटील व सुरेश पाटील कंपाऊंड, म्हात्रे नगर, तुकाराम वाडी, पाटील महाविद्यालय परिसर, रिजंन्सी, दावडी गाव, शंकरनगर, हॉरिझॉन मायसिटी व कासारिओ तसेच कासाबेला बिल्डिंग परिसर, मंगरुळ, उसटणे, उसटणे इंडस्ट्रिज पार्क, नऱ्हेन, पाली, चिरड, वाडी, करवले, पालेगाव, चिंचवणी, खोणी, काकडवाल, नेवाळी, नेवाडी पाडा, खरड, कुंभार्ली, पोसरी, शेलारपाडा, ढोका, कोळसेवाडी, म्हसोबा चौक, सिद्धार्थ नगर, मच्छी मार्केट, प्रभू राम नगर, जिम्मी बाग, शाहू गार्डन, लोकग्राम, लोकवाटिका, लोकधारा, नेतीवली नाका, मराठी शाळा, पुणे लिंक रोड, चिकनी पाडा, तिसगाव, शिवाजी कॉलनी, विजयनगर, विशालनगरी, घारडा केमिकल कंपनी, बीएआरसी, पलावा या भागात वीजपुरवठा सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत बंद राहील.

उल्हासनगर कुठे वीजपुरवठा बंद राहणार ?

उल्हासनगर दोन विभागात प्रेमनगर, हिरापुरी, शहा मार्केट, दशहरा मैदान, ओंकारानंद आश्रम, निजधाम, तहसिलदार दुधनाका, कैलास कॉलनी, वंसतबहार, समतानगर, गायकवाड पाडा एक व दोन, आकाश कॉलनी एक, कोळेकर पाडा, दूर्गा पाडा, आकाश किराणा, जेमनानी कंपाऊंड, शांतीप्रकाश आश्रम, साई आर्केड, ओटी सेक्शन, कुर्ला कँप रोड, श्रीराम नगर, एकता नगर, आकाश कॉलनी, बारा नंगर बस स्टॉप, मानेरा, व्हिनस, संभाजी नगर, लालचक्की, गजानन नगर, कुर्ला कँप, आशेळे पाडा, आशेळे गाव, गणपत नगर, नेताजी पाणीपुरवठा, उल्हासनगर चार व पाच विभाग, बारकू पाडा, रिलायन्स, पालेगाव, अंबरनाथ एफ टाईप एमआयडीसी विभाग, इंडस्ट्रियल भाग, अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र, आनंदनगर एमआयडीसी पुढील भागात सकाळी 8 ते दुपारी 1 दरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे. (Power outage in Dombivali, Kalyan East and some parts of Ulhasnagar on Friday)

इतर बातम्या

Ulhas River : अखेर उल्हास नदी जलपर्णीमुक्त झाली, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडून पाहणी

अश्लील व्हिडीओ शूट करुन प्रियकराकडूनच ब्लॅकमेल, अल्पवयीन मुलीवर सहा महिने तिघांचा गँगरेप

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.