Kalyan : धावत्या एक्सप्रेसमध्ये मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या नराधमाला ‘तिने’ 12 तास पकडून ठेवले

महिला तिच्या मुलांसोबत तिच्या भदोई येथील माहेरी होती. ती आता घरी परतत होती. सगळे मेल एक्सप्रेसच्या जनरल बोगीतून प्रवास करीत होते. इटारसी स्थानक येताच सहा वर्षाच्या लहान मुलीने रडायला सुरुवात केली. तिने सांगितले की एका व्यक्तीने तिच्यासोबत लैगिंक अत्याचार केला. आईला हा प्रकार कळताच तिने त्या मुलीला सोबत घेऊन संपूर्ण बोगीत शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर तो नराधम सापडला.

Kalyan : धावत्या एक्सप्रेसमध्ये मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या नराधमाला 'तिने' 12 तास पकडून ठेवले
धावत्या एक्सप्रेसमध्ये मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या नराधमाला तिने 12 तास पकडून ठेवले!
अमजद खान

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Feb 18, 2022 | 8:37 PM

कल्याण : धावत्या मेल एक्सप्रेस (Express) गाडीत सहा वर्षाच्या मुलीवर एकाने अतिप्रसंग केला. मुलीच्या आईला कळताच तिने त्या नराधम (Accused) प्रवाशाला गाडीतून शोधून काढले. या महिलेची हिंमत बघा तिने या नराधमाला जवळपास 12 तास गाडीतच पकडून ठेवले. गाडी कल्याण स्थानकात येताच त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सोनू प्रजापती असे या नराधमाचे नाव आहे. सध्या आरोपी इटारसी पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र मुलीच्या आईने दाखविलेल्या हिंमतीला सलाम आहे. मात्र इटारसी ते कल्याण येईपर्यंत एवढे स्टेशन आहेत. इतर पोलिसांनी आरोपीला का ताब्यात नाही घेतले हा मोठा प्रश्न चिन्ह आहे. (She was held for 12 hours by a man who sexually assaulted a girl in a running express)

गोरखपूरहून कल्याणला येत असताना घडली घटना

उत्तर प्रदेशातील भदोईहून एक महिला तिची आई आणि दोन मुले आणि दोन मुली गोरखपूर दादर काशी एक्सप्रेसमध्ये बसले. त्यांना कल्याणला यायचे होते. महिलेचा पती बदलापूर येथे राहतो. महिला तिच्या मुलांसोबत तिच्या भदोई येथील माहेरी होती. ती आता घरी परतत होती. सगळे मेल एक्सप्रेसच्या जनरल बोगीतून प्रवास करीत होते. इटारसी स्थानक येताच सहा वर्षाच्या लहान मुलीने रडायला सुरुवात केली. तिने सांगितले की एका व्यक्तीने तिच्यासोबत लैगिंक अत्याचार केला. आईला हा प्रकार कळताच तिने त्या मुलीला सोबत घेऊन संपूर्ण बोगीत शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर तो नराधम सापडला. मुलीनेही त्या नराधमाला ओळखले.

पीडित मुलीच्या आईन 12 तास पकडून ठेवले आरोपीला

आईने त्या नराधमाला जाम चोप दिला आणि त्याला तिच्या सीटजवळच बसवून ठेवले. मुलीच्या आईने या सोनूला जवळपास 12 तास एकाच जागेवर पकडून बसून राहिली. याची माहिती कल्याण जीआरपी पोलिस स्थानकातील नियंत्रम कक्षाला देण्यात आली होती. गाडी कल्याण रेल्वे स्थानकात येताच पोलिसांनी सोनू प्रजापतीला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल केला. घटना इटारसी स्थानकाजवळ घडल्याने त्या ठिकाणच्या पोलिसांना माहिती देऊन हा गुन्हा वर्ग करण्यात आला. इटारसी पोलिसांचे एक पथक कल्याणला आले आणि सोनूला ताब्यात घेऊन ते इटारसीला निघून गेले. आरोपीला शिक्षा होणार मात्र आपल्या अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार झाला. त्याला शिक्षा व्हावी म्हणून त्या आरोपीला एकटीनेच 12 तास पकडून ठेवले. या धाडसी आईला सलाम आहे. पोलिसांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले आहे. (She was held for 12 hours by a man who sexually assaulted a girl in a running express)

इतर बातम्या

Nashik Accident : दैव बलवत्तर म्हणून अपघातातून 5 शिक्षक बचावले, कंटेनरखाली कार घुसल्याने झाला अपघात

Iqbal Kaskar : दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ईडीकडून अटक

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें