AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: लसीकरण केंद्रावर चालूपणा, संतापलेल्या राजन विचारेंनी शिवसैनिकाला मारला फटका, व्हिडीओ व्हायरल

शिवसेना खासदार राजन विचारे कोरोना लसीकरण केंद्रावर गोंधळ प्रकरणी चांगलेच संतापलेले दिसून आले.ठाण्यात खासदार राजन विचारे यांच्यातर्फे चंदनवाडी येथील शुभम मंगल कार्यालय येथे लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.

Video: लसीकरण केंद्रावर चालूपणा, संतापलेल्या राजन विचारेंनी शिवसैनिकाला मारला फटका, व्हिडीओ व्हायरल
राजन विचारेंनी शिवसैनिकाला फटका मारला
| Edited By: | Updated on: Jul 03, 2021 | 5:21 PM
Share

ठाणे: शिवसेना खासदार राजन विचारे कोरोना लसीकरण केंद्रावर गोंधळ प्रकरणी चांगलेच संतापलेले दिसून आले.ठाण्यात खासदार राजन विचारे यांच्यातर्फे चंदनवाडी येथील शुभम मंगल कार्यालय येथे लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लसीकरणाचे फक्त तीनशे डोस च होते. मात्र, ठाण्यात गेले दोन दिवस लसीकरण बंद असल्यामुळे या ठिकाणी लसीकरणासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. एक शिवसैनिक यावेळी त्याच्या ओळखीच्या व्यक्तींना लसीकरणासाठी सोडताना दिसल्यानंतर राजन विचारे संतापले. संबंधित शिवसैनिकाला राजन विचारे यांनी छातीवर फटका लगावला. (Shivsena MP Rajan Vichare angry over Shivsena Worker and beat due to malpractice at corona vaccination cenrter video viral on social media)

नेमकं काय घडलं?

ठाण्यात खासदार राजन विचारे यांच्यातर्फे शुभम मंगल कार्यालय येथे लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लसीकरणाचे फक्त तीनशे डोस च होते. मात्र ठाण्यात गेले दोन दिवस लसीकरण बंद असल्यामुळे या ठिकाणी लसीकरणासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यासाठी नागरिकांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. त्यामुळे गर्दी लक्षात घेता फक्त दोनशे जणांचे लसीकरण करण्याचं ठरवण्यात आलं होतं. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि शिवसैनिक प्रयत्न करत होते. त्याच वेळी गेटमधून ओळखीच्या लोकांना आत सोडले जाते असे तेथील नागरिकांनी आरोप केला. त्यामुळे राजाने विचारले यांना राग आला.  त्याचवेळी गेटवर असणाऱ्या शिवसैनिकाला राजन विचारे यांनी फटका मारला.

ओळखीच्या व्यक्तींना न सोडण्याचे आदेश

संतापलेल्या शिवसेना खासदार राजन विचारे यांनी शिवसैनिकाला छातीवर फटका मारत ओळखीच्या माणसांना आत मध्ये न सोडण्याचे बजावले. अगदी थोड्या वेळातच राजन विचारे यांनी शिवसैनिकाला फटका मारलेला व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला.

ठाण्यात दोन तीन दिवस लसीकरण बंद

ठाण्यात गेले दोन दिवस लसीकरण बंद असल्यामुळे या ठिकाणी लसीकरणासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यासाठी नागरिकांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. त्यामुळे गर्दी लक्षात घेता फक्त दोनशे जणांचे लसीकरण करण्याचं ठरवण्यात आलं होतं. ठाण्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून लसीकरण बंद आहे. शिवसेना आणि इतर पक्षांच्या वतीनं लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या:

ठाण्यात लसीकरण केंद्रावर गोंधळ, शिवसेनेचे खासदार राजन विचारे संतापले

(Shivsena MP Rajan Vichare angry over Shivsena Worker and beat due to malpractice at corona vaccination cenrter video viral on social media)

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.