उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापतींना धमकीचे पत्र, शिवसैनिक आक्रमक

उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती शुभांगी बेहनवाल यांना धमकी देण्यात आली आहे. बेहनवाल यांच्या दालनात टेबलवर अज्ञाताने धमकीचं पत्र ठेवलं.

उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापतींना धमकीचे पत्र, शिवसैनिक आक्रमक
ULHASNAGAR
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 8:51 PM

ठाणे : उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती शुभांगी बेहनवाल यांना धमकी देण्यात आली आहे. बेहनवाल यांच्या दालनात टेबलवर अज्ञाताने धमकीचं पत्र ठेवलं. याच पत्रात बेहनवाल यांना जीवितास हानी पोहोचवण्याची धकमी देण्यात आली आहे. या प्रकारानंतर महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे. (Shubhangi Behanwal chairperson of Ulhasnagar Municipal Corporation education committee has been threatened)

शिक्षण समितीच्या सभापतींच्या टेबलवर धमकीचं पत्र 

शुभांगी मनोहर बेहनवाल या उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती आहेत. शिवसेनेच्या सदस्य असलेल्या बेहनवाल यांना काही महिन्यांपूर्वीच सभापतीपद मिळालं आहे. यानंतर त्यांनी उल्हासनगरातील महापालिकेच्या शाळांची चौकशी सुरू केली. सगळीकडे व्यवस्थित सुविधा पुरवल्या जातात की नाही? याची चौकशी आणि खातरजमा त्या करत होत्या. याचदरम्यान आज सकाळी त्या महापालिकेत त्यांच्या केबिनला आल्या. त्यावेळी त्यांच्या टेबलवर धमकीचं पत्र ठेवण्यात आल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.

धमकीच्या पक्षानंतर महापालिकेत मोठी खळबळ

“जास्त चौकशी करू नका, नाहीतर तुमचा पण मनोज शेलार करावा लागेल!”, असा मजकूर एका कागदावर टाईप करून तो बेहनवाल यांच्या टेबलवर ठेवण्यात आला होता. यानंतर महापालिकेत मोठी खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे पत्रात उल्लेख असलेले मनोज शेलार हे मनसेच्या विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष असून ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये ते थोडक्यात बचावले होते.

बेहनवाल यांना धमकी देण्याचा उद्देश काय ?

या हल्ल्यानंतर शिक्षण मंडळातील भ्रष्टाचार बाहेर काढत असल्यानेच आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप शेलार यांनी केला होता. यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचीही नावं या प्रकरणात चर्चेत आली होती. त्यामुळे बेहनवाल यांना धमकी देण्याचा उद्देश काय आहे ? असा प्रश्न विचारला जातोय.

शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल

दरम्यान, बेहनवाल यांना धमकीचे पत्र आल्यानंतर आपण शाळांची चौकशी करून काहीही चुकीचं केलं नसून यामागे कोण असावं? हे अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया शुभांगी बेहनवाल यांनी दिली. तसेच हा प्रकार समजताच शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि ज्येष्ठ नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बेहनवाल यांच्या केबिनकडे धाव घेत संताप व्यक्त केला. तसेच या प्रकारामागे जो कुणी असेल, त्याला शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

इतर बातम्या :

मुंबई विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश हवाय? नावनोंदणी सुरु, संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर

हॉटेल, रेस्टॉरंट्ससाठी निर्बंध जैसे थेच; तिसरी लाट टाळण्यासाठी नियमांचं कठोर पालन गरजेचं – मुख्यमंत्री

विद्यार्थ्यांचे लसीकरण नाही, लोकलने प्रवास करण्यास मनाई, सीईटी परीक्षा कशी घेणार ? कोर्टाचा राज्य सरकारला सवाल

(Shubhangi Behanwal chairperson of Ulhasnagar Municipal Corporation education committee has been threatened)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.