पेट्रोल-डिझेल संपले, सफाळे आगारात बससेवा बंद; प्रवाशांचे प्रचंड हाल

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सफाळे बस आगारात पेट्रोल आणि डिझेल संपले आहे. त्यामुळे बससेवा बंद करण्यात आली आहे. (ST service stop in saphale due to shortage of petrol diesel)

पेट्रोल-डिझेल संपले, सफाळे आगारात बससेवा बंद; प्रवाशांचे प्रचंड हाल
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 11:28 AM

डहाणू: मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सफाळे बस आगारात पेट्रोल आणि डिझेल संपले आहे. त्यामुळे बससेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत असून प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. बस सेवाच बंद झाल्याने प्रवाशांना सफाळे बाहेर पडण्यास अडचणी येत आहेत.

पेट्रोल, डिझेल दर वाढीचा सरकारी वाहनांनाही फटका बसताना पाहायला मिळतोय. डिझेल अभावी पालघरमधील सफाळे आगारातील बस सेवा बंद करण्यात आली आहे. गाव पाड्यांना जोडणाऱ्या सफाळे आगारातील जवळपास शंभर फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय आगाराने घेतल्याने चाकरमानी, प्रवाशांचे हाल सुरू आहेत. बससेवा बंद असल्याने खाजगी वाहनांनी प्रवाश्यांना प्रवास करावा लागत असून यामुळे मात्र खाजगी वाहन चालकांकडून प्रवाश्यांची लूट होत असल्याचा आरोप प्रवाश्यांकडून करण्यात येतोय. तर लवकरात लवकर बस सेवा सुरळीत करण्याची मांगणी प्रवाश्याकडून करण्यात येत आहे.

गावपाड्यात जाणंही मुश्किल

सफाळे आगारात डिझेल अभावी बस सेवा बंद आहे. त्यामुळे गावपाड्यांना जोडणाऱ्या सफाळे आगारातील जवळपास शंभर फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सफाळेतील ग्रामस्थांना मुंबई आणि ठाण्याकडे येणंही मुश्किल झालं आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील इतर पाड्यात जाण्यासाठी त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, खासगी वाहनधारकांकडून लूट केली जात असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय?

दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी इंधनाच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. यापूर्वी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 25 आणि 30 पैशांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा हा वेग पाहता सामान्यांना पुन्हा एकदा धडकी भरली होती. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल 1.05 रुपयांनी महागले आहे. तर डिझेलची किंमत 2.09 रुपयांनी वाढली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 108.44 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 98.45 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 102.39 आणि 90.77 रुपये इतका आहे.

दसऱ्यापर्यंत रेकॉर्ड ब्रेक वाढ?

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढीचा कल आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80 च्या जवळ पोहोचली आहेयेत्या एक ते दोन आठवड्यांत देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. अनेक शहरांमध्ये ते 110 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचा दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ नुकसान सोसून इंधनाचे दर स्थिर ठेवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, लवकरच सामान्य नागरिकांना याचा फटका बसू शकतो. दसऱ्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नवे उच्चांक प्रस्थापित करतील, असा जाणकारांचा होरा आहे. प्रत्यक्षात असे घडल्यास सामान्य नागरिकांना त्याची प्रचंड झळ सोसावी लागेल.

संबंधित बातम्या:

डिजिटल सातबारा उतारा काढायचा कसा? शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी..

प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा; उत्तर महाराष्ट्रात 5210 शाळा सुरू, प्रवेशोत्सव सोहळा रंगला!

प्रियांका गांधी नजरकैदेत, काँग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांना UP मध्ये पाऊल ठेवण्यास बंदी, योगी सरकारचं चाललंय काय?

(ST service stop in saphale due to shortage of petrol diesel)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.