डिजिटल सातबारा उतारा काढायचा कसा? शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी..

दोन दिवसापूर्वीच डिजिटल स्वाक्षरीत सुधारीत सातबारा (Satbara) थेट शेतकऱ्यांच्या हाती पडावा यासाठीची मोहिम सुरु करण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही ही डिजिटल सातबारा काढायचा कसा याची माहिती शेतकऱ्यांनाही नाही. शिवाय ग्रामसेवक, तलाठी हे देखील यापासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे सातबाऱ्याचे महत्व आणि डिजिटल स्वाक्षरीत असलेला सातबारा काढायचा कसा याची माहिती आज आपण घेणार आहोत.

डिजिटल सातबारा उतारा काढायचा कसा? शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी..
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 11:11 AM

लातूर: कृषी (Agree Dipartment) व्यवसायामध्ये देखील डिजिटल (Digital) प्रणाली दिवसेंदिवस रुजत आहे. कारभारात तत्परता येण्याच्या अनुशंगाने केंद्र सरकार यावर भर देत आहे. शिवाय दोन दिवसापूर्वीच डिजिटल स्वाक्षरीत सुधारीत सातबारा (Satbara) थेट शेतकऱ्यांच्या हाती पडावा यासाठीची मोहिम सुरु करण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही ही डिजिटल सातबारा काढायचा कसा याची माहिती शेतकऱ्यांनाही नाही. शिवाय ग्रामसेवक, तलाठी हे देखील यापासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे सातबाऱ्याचे महत्व आणि डिजिटल स्वाक्षरीत असलेला सातबारा काढायचा कसा याची माहिती आज आपण घेणार आहोत.

जमिनीची खरेदी-विक्री करताना जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक आहे. जसं की ती जमीन सध्या कोणाच्या नावे आहे? त्या जमिनीचा मूळ मालक कोण होता? जमिनीवर कोणते कर्ज घेतले आहे काय? वेळोवेळी त्यात कोणकोणते नवीन बदल होत गेले? यासंबधीची माहिती सातबारा, फेरफार बदल या रुपाने तहसील कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे. मात्र, काळाच्या ओघात शासनानेही यामध्ये बदल केले आहेत.

शेतकऱ्यांनाही अत्याधुनिक प्रणालीची माहिती होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. शिवाय सातबारा उताऱ्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाला खेटे मारावे लागत होते आता मात्र, घरबसल्याही तुम्ही सातबारा उतारा काढू शकणार आहोत. शिवाय अशा पध्दतीने काढण्यात आलेला सातबारा हा कायदेशीररित्या ग्राह्य धरला जाणार आहे.

सातबारा उतारा (7/12) म्हणजे काय?

सातबाराचा उतारा हा जमिनीचा मुळ मालकी हक्क कोणाचा आहे हे दर्शवितो. याशिवाय जमीनधारकास स्वतःच्या नावे असलेली जमीनी किती आहे? जमिनीचे सहहिस्सेदार कोण आहेत? जमिन कोणती आहे? जमिनीत फेरफार कधी झाले व कोणते? ही माहिती सातबारा उतारा वरून मिळते. ही महत्वाची माहिती घेण्यासाठी आता तलाठी कार्यालय किंवा कोणाकडे चौकशी करावी लागणार नाही. व्यवहार केल्या जाणाऱ्या जमिनीचा संपूर्ण अंदाज तुम्हाला घरबसल्या मिळतो. गावातील प्रत्येक जमिनींच्या नोंदी गावातील तलाठीकडे असतात. त्यापैकी 7 क्रमांक नुसार मालकी हक्क, हिस्सेदारांची नावे, जमिनीचे नाव, लागवड योग्य क्षेत्र इत्यादी उल्लेख असतात. तर बारा क्रमांकनुसार जमिनीत घेण्यात येणाऱ्या पिकांच्या प्रकारांची माहिती असते. अश्या प्रकारे सातबारा बनतो.

ऑनलाईन सातबारा (7/12) उतारा कसा काढायचा?

1. सर्वप्रथम https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या महाराष्ट्र महसूल विभागाच्या वेबसाईट जावं लागतं. ऑनलाईन सातबारा Satbara utara काढण्यासाठी वेबसाईटवर दोन पद्धती दिसतील:

A). Regular Login

B). OTP Login

A). Regular Login – जर तुम्ही आगोदरच यावर Login केले असेल तर तुम्हाला इथे नोंदणी करावी लागले. त्यात तुम्हाला OTP ची गरज लागत नाही. हा पर्याय जास्त सोईस्कर असतो.

B). OTP Login – यामध्ये तुमच्या मोबाईलवर एक OTP येतो. तो प्रत्येक वेळेस तुम्हाला सातबारा काढण्यासाठी टाकावा लागतो. जर तुम्ही आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.

2. सातबारा काढण्याची तुमची पहिलीच वेळ असेल तर, ‘New User Registration’ इथे क्लिक करून, तुमची वैयक्तिक माहिती भरुन नोंदणी करायची आहे.

3. यानंतर खाली ‘Please Check Availability of your Login Id’ इथे क्लिक करून यूजर नेम आणि पासवर्ड निवडायचा आहे. त्यानंतर ‘Submit’ वर क्लिक केल्यांनतर तुम्हाला ‘User Registration successful Click Here to Login’ म्हणून मेसेज दिसेल. म्हणजेच तुमची यशस्वीरित्या नोंदणी झाली आहे.

4. त्या मेसेजे वरील ‘Click Here to ‘Login’यावर क्लीक करावं. यानंतर तुम्ही निवडलेला यूजरनेम, पासवर्ड आणि ‘Captcha'(कोड वर्ड) टाकून त्यात लॉगिन व्हावे.

5. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यात तुमचा जिल्हा, तालुका, गाव टाकून सातबाराचा सर्वे नंबर/गट नंबर टाकून, अंकित सातबारा हा पर्याय निवडावा.

६. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी प्रथम ‘Recharge Account ‘ या पर्यायवर क्लीक करून अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये काही रक्कम घ्यावी लागेल. प्रत्येक डिजिटल स्वाक्षरी सातबाराचे digital online satbara एक पेज डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला रु. 15 इतकी किंमत आकारली जाते. ही रक्कम तुम्ही बनवलेल्या सातबारा डिजिटल स्वाक्षरी या ऑनलाईन अकाउंटमध्ये रिचार्ज केलेल्या रकमेतून कमी केली जाते. (How to remove digital seven times extract? Important news for farmers. Read the full process)

संबंधित बातम्या :

‘लक्षात असू द्या’ कोऱ्या कागदावर सह्या म्हणजे फसवणूक, आ. माधवराव पाटलांकडून विमा कंपन्यांच्या कारभाराची पोलखोल

…म्हणून उडदाच्या दरात वाढ, शेतकऱ्यांनो मालाची काळजी घ्या अन् योग्य दर मिळवा

छत्तीसगडच्या शेतकऱ्याने नापीक जमिनीत आणली हिरवळ, आज 500 लोकांना रोजगार

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.