AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan-Dombivali | आता संयुक्तिक पथक रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या केमिकल टॅन्करवर वॉच ठेवणार

या संयुक्त पथकाकडून केमिकल टॅन्करवर वॉच ठेवला जाणार आहे. हे टँकर विशेषत: रात्रीच्या अंधारात फिरतात. संध्याकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत हा वॉच अधिक जागरुकपणे ठेवला जाणार आहे. यापूर्वी उल्हास नदी आणि वालधुनी नदी पात्रात रासायनिक टँकरने केमिकलयुक्त सांडपाणी सोडल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत.

Kalyan-Dombivali | आता संयुक्तिक पथक रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या केमिकल टॅन्करवर वॉच ठेवणार
आता संयुक्तिक पथक रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या केमिकल टॅन्करवर वॉच ठेवणार
| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 11:35 PM
Share

कल्याण : कल्याण डोंबिवलीसह अंबरनाथ बदलापूर शहरातील केमिकल कंपन्यातून केमिकल युक्त सांडपाणी अनेकदा टँकरच्या माध्यमातून थेट नदी नाल्यात सोडले जाते. केमिकलयुक्त सांडपाणी नदी नाल्यात सोडल्याने प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी केमिकल टँकरवर वॉच ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, पोलीस प्रशासन आणि आरटीओ यांच्या माध्यमातून संयुक्त पथक तयार करण्यात आले. नदी नाल्याच्या परिसरात या पथकाचा वॉच राहणार असून केमिकल टँकर नदी नाल्यात सोडल्यास कायदेशीर कारवाई करुन टँकर कायम स्वरुपी जप्त केला जाणार आहे.

संयुक्तिक पथक ठेवणार वॉच

कल्याण डोंबिवली परिसरातील डोंबिवली येथे केमिकल कंपन्या आहेत. त्याचबरोबर अंबरनाथ आणि बदलापूर येथेही केमिकल कंपन्या आहेत. या कंपन्यातून केमिकलयुक्त सांडपाणी प्रक्रिया करुन नदी नाल्यात सोडले जात असले तरी काही केमिकल कंपन्या या केमिकलयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता टँकरच्या माध्यमातून थेट नदी नाल्यात सोडतात. त्यामुळे उल्हास नदी वालधुनी नदीचे प्रदूषण होत आहे. अशा टँकरवर वॉच ठेवण्यासाठी संयुक्तिक पथक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये आरटीओसह प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि स्थानिक पोलिसांचा समावेश आहे.

टँकर चालकावरही फौजदारी गुन्हा दाखल होणार

या संयुक्त पथकाकडून केमिकल टॅन्करवर वॉच ठेवला जाणार आहे. हे टँकर विशेषत: रात्रीच्या अंधारात फिरतात. संध्याकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत हा वॉच अधिक जागरुकपणे ठेवला जाणार आहे. यापूर्वी उल्हास नदी आणि वालधुनी नदी पात्रात रासायनिक टँकरने केमिकलयुक्त सांडपाणी सोडल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. तसेच गुन्हा दाखल करुन चालकाच्या विरोधात कारवाईही करण्यात आलेली आहे. आता हीच कारवाई अधिक तीव्र करण्यावर संयुक्तिक पथक भर देणार आहे. पोलीस अशा टँकर चालकाला अटक करुन त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करतील. पर्यावरणाला हानी पोचवून प्रदूषण केल्याप्रकरणीही कारवाई केली जाईल. त्याचबरोबर आरटीओकडून अशा प्रकारचा टँकर कायम स्वरुपी जप्त केला जाईल असे कल्याण आरटीओ तानाजी चव्हाण यांनी सांगितले. (The joint team will now keep a watch on the chemical tanker that discharges chemical wastewater)

इतर बातम्या

Kalyan Crime : मंडप डेकोरेशनचे पैसे मागितले म्हणून एकाला बेदम मारहाण; एकाला अटक तर दोघे फरार

Love breakup | प्रेयसीशी जबरदस्तीचा प्रयत्न; नकार देताच गळफास लावला पण…

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.